विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची घोषणा महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यात केली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे मिळणार आहे. 2100 रुपये मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
2100 रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीआधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. राज्यात ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली. जवळपास अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. त्यानंतर जुलैपासून या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देण्यास सुरुवात झाली. तसेच नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऑक्टोंबर अन् नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित देण्यात आले होते.
Devendra Fadnavis : राहुल गांधी परभणीला आले, राजकारण पेरून गेले; मुख्यमंत्र्यांसह भाजपचा हल्लाबोल!!
विधानसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदा मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे. यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर महिन्यांच्या अंतिम महिन्याच्या आठवड्यात सर्व पैसे दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना लाभ मिळणार आहे. त्यानंतर उर्वरित महिलांना पैसे दिले जाणार आहे. योजनेसाठी लागणारा 3500 कोटी रुपयांची निधी वर्ग करण्यात आला आहे.
Waiting for the budget to get 2100 rupees to Ladki Bahin, 1500 rupees in the month of December
महत्वाच्या बातम्या
- PM मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान, ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्राप्त करणारे पहिले भारतीय पंतप्रधान
- Ajit Pawar : भुजबळांचे जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना वर अजित पवार म्हणाले….
- राज – उध्दव ठाकरे नात्यात संजय राऊतांचा बिब्बा, म्हणाले मोदी, शहा, फडणवीस राज यांचे आयडॉल
- वाळू माफियांची दादागिरी मोडून काढणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा