विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Satej Patil काँग्रेस – राष्ट्रवादीने यापुर्वी सुध्दा अनेक महापालिका निवडणूका स्वतंत्र लढवल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाची भूमिका अशीच आहे. शक्य होईल तिथे युती होईल. शक्य होणार नाही तिथं स्वतंत्र लढू, असे सांगत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महाविकास आघाडी फुटल्याची कबूली दिली.Satej Patil
शिवसेना ठाकरे गटाने महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. यावर बोलताना सतेज पाटील म्हणाले, मुंबई , ठाणे सह काही महापालिका निवडणूका स्वतंत्र लढवण्याची शिवसेना ठाकरे पक्षाने भूमिका घेतलेली आहे. कारण प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकत्र बसून याबाबतीत धोरण ठरवतील. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची युती होईल. राज्यामध्ये शक्य होईल तिथं युती करु. शक्य होणार नाही तिथं स्वतंत्र लढू.
पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत अनेकजण इच्छुक असतात. त्यामुळे स्वतंत्र लढण्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडली असं नाही. महायुतीत सुद्धा अशीच वक्तव्य येत आहेत. काँग्रेस पक्ष मोठा आहे. त्यामुळे काँग्रेसची ताकद असेल तिथं स्वबळावर लढवण्याची वेळ आल्यास निश्चित स्वतंत्र लढू. विधानसभेचा पॅटर्न वेगळा आणि महापालिकेचा पॅटर्न वेगळा असतो.
अमोल कोले यांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्याबाबत ते म्हणाले, अमोल कोल्हे यांनी जपून वक्तव्य करायला हवं होतं. काँग्रेसची पाठ किती सक्षम आहे हे अनकूल परिस्थिती नसतानासुद्धा देशात 99 खासदार निवडून आले. हे देशाने बघितले आहे.
-संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निपक्ष:पातीपणे चौकशी झाली पाहिजे. भाजपचे आमदार सुरेश धसांच्या मुद्यांची एसआयटी चौकशी होणार आहे काय? हा महत्वाचा प्रश्न आहे. चौकशी पूर्ण होवून चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत शासनाची भूमिका कळणार नाही. चार्जशीट मध्ये आरोपी सुटण्यासाठी मदत होणार का? शिक्षा होण्यासाठी मदत होणार हे चार्जशीट फाईल झाल्यावर समोर येईल. चार्जशीट फाईल झाल्याशिवाय शासनाची भूमिका किती प्रामाणिक आहे, हे कळणार नाही, असा आरोपही त्यांनी केला.
Where it is possible alliance, Satej Patil also admitted that the Mahavikas Aghadi has split
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे गटाचे स्वबळावरच निवडणुका लढविण्याचे संकेत, महाविकास आघाडीत फूट स्पष्ट
- Sanjay Raut स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, संजय राऊत यांची आरोळी
- वाल्मिक कराड वगळता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का
- Sanjay Raut काही लोक मुख्यमंत्रीपदाचा कोट शिवून बसले होते, संजय राऊत यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल