विशेष प्रतिनिधी
सांगली: आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीचा विचार कुठेतरी विसरलेत. कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी विचार करावा, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघात प्रचारासाठी गेले नव्हते याचा संदर्भ देऊन भावकीचा विचार केला म्हणून तू निवडून आलास असे अजित पवार म्हणाले होते. यावर रोहित पवार म्हणाले, काही वर्षांपूर्वी अधिवेशनात मी भाषण केले होते. अनेक लोकांनी सांगितले की, भाषण चांगले झाले. मग मला अजितदादांचा फोन आला. त्यावेळी आम्ही पार्टी म्हणून एकत्र होतो. त्यांनी मला घरी बोलावले. माझी अपेक्षा होती की, ते माझ्या भाषणाचे कौतुक करतील. अजून चांगले भाषण कर असे म्हणतील. पण त्यांनी सांगितले, भाषण चांगले झाले, पण एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगतो. भाषण देत असताना कॅमेरा तुझ्यावर फोकस असतो. त्यामुळे शर्टचे वरचे बटण वगैरे लावत जा. त्यांचे एवढे बारीक लक्ष माझ्यावर होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कौतुक करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधताना रोहित पवार म्हणाले, सांगली जिल्ह्यात संस्कृतीला फार महत्त्व दिले जाते. येथे चंद्रकांत पाटीलही आहेत. ते भाजपचे नेते असले तरी ते त्या पक्षाचे खऱ्या अर्थाने सोने आहेत. आम्ही त्यांना जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा ते आमचे ऐकूण घेतात. एखाद्या मुलाचा किंवा विद्यार्थ्याचा प्रश्न असेल तर लगेच फोन लावतात. ही त्यांची स्टाईल आम्हाला आवडते. चंद्रकांत पाटील राजकारणाच्या जागी राजकारण व समाजकारणाच्या जागी समाजकारण करतात. ते खरे सोने आहेत. पण सध्या काही बेन्टेक्सचे लोक या जिल्ह्यात फिरत आहेत. ते खालच्या पातळीवर जाऊन काही मोठ्या नेत्यांवर टीका करत आहेत. त्यामुळे या बेन्टेक्सच्या सोन्याचे काय करायचे हे भाजपच्या खऱ्या सोन्याने लक्षात घेतले पाहिजे.
रोहित पवार म्हणाले, या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अनेक दिग्गज नेते बसलेत. क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाले तर राजकारणाते मोठे खेळाडू या व्यासपीठावर बसलेत. अजितदादांच्या बाबतीत बॉलिंगच्या स्टाईलमध्ये बोलायचे झाले तर दादा यॉर्कर टाकणारे आहेत. ते फास्ट बॉलर आहेत. त्यांच्या स्पीडची काही प्रमाणात फलंदाजालाही भीती वाटते. दुसरीकडे, चंद्रकांत पाटील कधी बॅटिंग, तर कधी बॉलिंग करतात. ते मीडियम पेस बॉलर आहेत. ते चांगली बॉलिंग करतात.जयंत पाटील हे कधी ऑफ स्पिन टाकतात, तर कधी लेग स्पिन टाकतात. मध्येच ते गुगलीही टाकतात. कधी बॉल त्यांच्या हातातच असतो, पण आम्हाला बॅट्समनला वाटते की, त्यांनी बॉलिंग सुद्धा टाकली. आम्ही या मोठ्या खेळाडूंपुढे जमेल तसा बॉल मारण्याचा प्रयत्न करत आहोत.
While Talking About Society, You Forgot the Family, Rohit Pawar Hits Back at Ajit Dada”
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला