विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aditya Thackeray बीड आणि परभणी प्रकरणात अद्याप कारवाई का झाली नाही. सरकार कुणाला घाबरतंय? असा सवाल माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.Aditya Thackeray
या प्रश्नावर सरकारच्यायय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आदित्य ठाकरे म्हणाले, गेले पाच सहा दिवस सरकार सुट्टीवर आहे असं वाटत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर सरकार काही कारवाई करत नाही.
बीडमध्ये सगळे जे काही चालले आहे ते कोणासाठी चालले आहे ? यात सरकार कोणाला वाचवत आहे?दोन आठवडे झाले हे बीडमध्ये कुठलीही कारवाई दिसत नाही. बीडमधील वातावरण अस्थिर आहे
सरकार सुट्टीवर गेले आहे का? कुठल्याच घटनेवर सरकार भूमिका मांडत नाही असा सवाल करत आदित्य ठाकरे म्हणाले, परभणी आणि बीडसाठी अधिवेशनात मांडलेले मुद्दे बघा आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर बघा. त्यावेळी वाटलं होतं की मुख्यमंत्री कारवाई करतील. पण अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
प्राजक्ता माळी यांच्या आरोपांवर ते म्हणाले, मी हे सर्व प्रकरण पाहिलेलं नाही. मला त्यामध्ये जायचं सुद्धा नाही .म्हणून मी काही बोलत नाही.
मुंबई मध्ये स्वच्छतेचे काम सुरू आहे म्हणजे वॉटर स्प्रिंकलच काम होणार आहे. त्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. मुळात ज्या बिल्डरांवर कारवाई झाली पाहिजे ती होत नाही. मागचे मिंधे सरकार बिल्डर, कंत्राटदारांचे होते,. आता भाजपचं सुद्धा बिल्डरचे सरकार आहे का? असेही त्यांनी विचारले.
एसटीचे दर वाढणार आहेत.पाण्याचे दर वाढणार आहेत . सगळीच दरवाढ होणार आहे. तसेच जीएसटीचा मारा देखील सुरूच आहे. हे सगळं पाहून सामान्य माणसाने जायचं कुठे? हा प्रश्न निर्माण होतो. आज भाजप कुठल्याही गोष्टीवर बोलत नाही, बाकीचे विषय हे लोक शोधून काढतात परंतु मूळ मुद्द्यावर बोलत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
वरळीमध्ये श्री आयाप्पा महापुजेसाठी आलो होतो, दर्शन घेतले. मी मंदिरात जातो तेव्हा काहीही मागत नाही फक्त दर्शन घेतो. देव सगळं पाहत आहे, असेही ते म्हणाले.
मुंबईमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे हवेमध्ये धूळ, फॉग आहे हे कोणालाच काही माहिती नाही आणि याच्यावर कोणी उत्तर देत नाही. अनेक हाऊसिंग सोसायटी व चाळी असतील तिकडे पाणी पोहोचत नाही आहे परंतु उत्तर द्यायला कोणीच नाही, अशी टीका त्यांनी केली.
Why action has not been taken yet in Beed and Parbhani case? Aditya Thackeray’s question
महत्वाच्या बातम्या
- South Korea दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात, 28 ठार; लँडिंग गिअर बिघडले, धावपट्टीवर स्फोट
- Goa : गोवा बनावटीची 31 लाख रुपयांची दारू जप्त
- उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट




















