मुंबई : Raj Thackeray डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की. भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत, की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावं, घडवावं यासाठी ‘ये दिल मांगे मोअर..’ ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच”, असंही राज ठाकरेंनी पुढे म्हटलं आहे.Raj Thackeray
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहणारी सविस्तर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये १९९१ च्या सुधारणांचा उल्लेख करत म्हटले आहे की भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं. १९९१ ला जेव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासाची होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता, साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली होती. अशा वेळेस भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारांनी ज्या बेड्या घातल्या होत्या, त्या तोडून काढण्याचं काम डॉ. मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचं धोरण स्वीकारून केलं. अर्थात नरसिंहरावां सारख्या पंतप्रधानाची साथ त्यांना लाभली हे देखील खरं.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं. १९९१ ला जेंव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेंव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासाची होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता, साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली… pic.twitter.com/hZCkKw8jqv
— Raj Thackeray (@RajThackeray) December 27, 2024
आर्थिक सुधारणा राबवताना मनमोहन सिंग यांनी संसदेत केलेला एक उल्लेख राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. “जुलै १९९१ साली संसदेत भाषण करताना मनमोहन सिंगांनी एक वाक्य वापरलं होतं. “no power on earth can stop an idea whose time has come” (ज्या कल्पनेची वेळ आलेली असते, तिला पृथ्वीवरची कोणतीही शक्ती अस्तित्वात येण्यापासून रोखू शकत नाही). थोडक्यात भारताचा काळ सुरु होत आहे आणि आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही. भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉ. मनमोहन सिग. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले. आणि ते देखील सलग दहा वर्ष. अशा पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हातून घेतलेले काही निर्णय हे चांगले, तर काही चुकणार हे स्वाभाविक आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली गेली, त्यांच्या हेतूंवर शंका घेतली गेली, त्यावरून पत्रकारांशी संवाद साधताना ते एक वाक्य म्हणाले होते, ‘I do not believe that I have been a weak Prime Minister. I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or for that matter the Opposition in Parliament…. ‘, असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“Ye Dil Mange More..” attitude architect Dr. Tribute to Manmohan Singh, Raj Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Dr Manmohan Singh : माजी PM मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन; 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा; मोदी म्हणाले- त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे
- Dr. Manmohan Singh माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन
- Nana Patole : परभणी व बीड हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, नाना पटोले यांचा आरोप
- Raju Shetty : सातबारा कोरा झाला नाही तर राज्यव्यापी आंदोलन, राजू शेट्टी यांचा इशारा