विशेष प्रतिनिधी
मुंबई : Election Commission नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत मतदारांना आकर्षित करणारी वक्तव्य महायुतीतील बड्या नेत्यांना भोवण्याची शक्यता आहे.Election Commission
तिजोरीच्या चाव्या
आपल्याकडे असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेत केले होते. मटण खा कोणाचेही बटण दाबा कमळच असे वक्तव्य भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केले होते . नगर विकास आपल्याकडे आहे. नगर विकास विभागात ‘माला’ची कमतरता नाही. मतदानाच्या आदल्या दिवशी पहाटे पहाटे लक्ष्मी दर्शन होईल, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. प्रचार काळात २० नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये केली असून यातज्या ज्या ठिकाणी नेत्यांच्या सभा असतात त्या त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कॅमेरे असतात. त्याच्या आधारे आता तपास केला जाणार आहे. २० नेते ज्यांच्या वक्तव्यांची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.Election Commission
आचार संहितेचे उल्लंघन झाले आहे का, याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवल्याचे राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत आपल्या पक्षाच्या अधिकाधिक जागा निवडून याव्यात यासाठी महायुतीतील प्रमुख नेत्यांसह मंत्र्यांनी ही सभेच्या माध्यमातून आपल्या पक्षाला मतदान करा, अशी साद घातली. मात्र याच वेळी मतदारांना प्रलोभने दाखवणारी वक्तव्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, चित्रा वाघ अशा २० हून अधिक नेत्यांनी केली. या प्रमुख नेत्यांची वक्तव्ये आचार संहितेचे उल्लंघन करणारी आहेत का, याची चौकशी करण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्री या नात्याने तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत, असे वक्तव्य केले होते. तिजोरी असलेली खोलीच आमची आहे असे उत्तर भाजपने दिले होते. त्यावर तिजोरी कोणाच्या बापाची नाही तर जनतेची असल्याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले होते
20 leaders on Election Commission’s radar, will be caught making misleading statements during campaign period
महत्वाच्या बातम्या
- Lt Gen Manjinder Singh : लेफ्टनंट जनरल म्हणाले- पाकने 90 तासांत गुडघे टेकले, ऑपरेशन सिंदूरमध्ये दीर्घ लढाईची तयारी होती
- Adani : अदानींनी 5 वर्षांपूर्वीचा कायदेशीर खटला संपवला; कोळसा खाण प्रकरणात ऑस्ट्रेलियाच्या कार्यकर्त्याशी समझोता
- पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत कंबर कसून उतरल्या का नाहीत??
- भय्याजींच्या दूरदृष्टीतून ईशान्य भारतात ईश्वरी कार्य ऊभे; भैय्याजी जोशींचे गौरवोद्गार; भैय्याजी काणे जन्मशताब्दी सांगता