विशेष प्रतिनिधी
मुंबई : आमदार रोहित पवारांची पत्रकार परिषद बघितल्यावर मी ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या, त्यात कुठेतरी तथ्य असल्याचं समोर आलं आहे. षडयंत्राचा छडा लावल्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शांत बसणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमाेल मिटकरी यांनी व्यक्त केला. amol-mitkari
अमोल मिटकरी म्हणाले, आमदार रोहित पवारांची पत्रकार परिषद बघितल्यावर मी ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या त्यात कुठेतरी तथ्य असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे रोहित पवारांनी मागणी केल्याप्रमाणे तत्काळ एका बाह्य संस्थेकडून सदर प्रकरणाची चौकशी ही झालीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांना नुकतंच याबाबत मी स्वत:भेटून पत्र दिले आहे. मुख्यमंत्री त्यांच्या अत्यंत जवळच्या व तितक्याच विश्वासु मित्राच्या घातपाती मृत्यु व त्यामागील षडयंत्राचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नाहीत याबद्दल माझ्या मनात दुमत नाही. amol-mitkari
आमदार रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्लीमध्येही पत्रकार परिषद घेऊन या अपघातांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्य पायलट कपूर यांच्यावरील शिस्तभंगाची कारवाई, मद्य प्राशन केल्याचा वाद हे मुद्दे रोहित पवारांकडून उपस्थित करण्यात आले आहेत. अजित पवारांच्या विमानाचा पायलट ऐनवेळी बदलण्यात आला होता. पायलट ट्रॉफिकमध्ये अडकल्यामुळे पायलट बदलला गेल्याचे सांगितले गेले. पण, इतक्या पहाटे मुंबईत ट्राफिक जाम असणे शक्य नाही, असेही रोहित पवारांनी म्हटले आहे. रोहित पवारांनी विमानाच्या मेंटेनन्सबद्दल आणि ज्या कंपनीकडे या विमानाच्या मेंटेनन्सचे काम आहे, तिच्या भूमिकेवर शंका उपस्थित केल्या आहेत. amol-mitkari