विशेष प्रतिनिधी
मुंबई: Raj Thackeray बाळासाहेबांनी या देशात हिंदूंना हिंदू शक्ती बनू शकते हे दाखवून दिले. भाजपला तर त्यावेळी कल्पना पण नव्हती, असा निशाणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साधला.Raj Thackeray
शिवसेना संस्थापक पक्षप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने श्री षण्मुखानंद सभागृहात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर आले होते. यावेळी राज ठाकरे बोलत होते.Raj Thackeray
राज ठाकरे याबाबतचा प्रसंग सांगताना म्हणाले, बाळासाहेब कलानगरमध्ये फेऱ्या मारायचे, ही गोष्ट आहे 94-95 ची असेल. तेव्हा बाळासाहेब प्रमोद महाजन यांना असे म्हणाले होते की, प्रमोद मी देशातील हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावेल आणि हिंदू मतदार तयार होतील. प्रमोद महाजन म्हणाले, हे शक्य नाही या देशात. यावर बाळासाहेब म्हणाले तू मला ओळखत नाहीस आणि बाळासाहेबांनी या देशात हिंदूंना हिंदू शक्ती बनू शकते हे दाखवून दिले. भाजपला तर कल्पना पण नव्हती. त्यावेळेला वातावरण सुद्धा वेगळे होते. आज बाळासाहेब असते आणि हिंदुत्वाचा बाजार पाहिला असता, तर निश्चित व्यथित झाले असते. मी काय सांगितले होते आणि तुम्ही काय करून ठेवले? असा प्रश्न त्यांनी विचारला असता. त्यांनी ज्या तडफेने जे विचार मानले, हिंदूंना हिंदू म्हणून जागे केले, मराठीला मराठी म्हणून जागे केले. हे आपण असेच जागे ठेऊ,.Raj Thackeray
राज ठाकरे म्हणाले, आज बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. आज सामनामध्ये मी लेख लिहिला आहे, त्यात अनेक आठवणी मी लिहिल्या आहेत. खरे तर त्या व्यक्तीला कसे मांडायचे हे अनेकदा प्रश्न माझ्यासमोर उभे राहतात, काका म्हणून मांडायचे, व्यंगचित्रकार म्हणून मांडायचे की काय.. त्यांचे अनेक किस्से हे न सांगण्यासारखे आहेत. तुम्हाला माहीत नाही काय होते ते, तुम्हाला फक्त भाषणातून झलक दिसली आहे.
राज ठाकरे म्हणाले, मी लहान असतानापासून त्यांना पाहत आलो आहे. बाहेर सगळं भयानक वातावरण सुरू असताना, हे जेव्हा व्यंगचित्र काढायला बसायचे, तेव्हा त्यात मला कधीच मारकाम नाही दिसले. ती समाधी लागणे म्हणतात. ते व्यंगचित्र नसून समाधी असायची. तेंडुलकरांचे एक फार छान पुस्तक आहे, ‘हे सगळे येते कुठून’, असे ते व्यक्तिमत्व आहे. देशातील सगळ्या राजकारण्यांपासून ते वेगळे होते, त्याचे कारणच ते असायचे.
राज ठाकरे म्हणाले, आज महाराष्ट्राची जी परिस्थिती झाली आहे म्हणजे गुलामांचा बाजार. आजची परिस्थिती बघून मला असे वाटत आहे की बाळासाहेब आज नाहीत तेच बरे आहे. काय त्रास झाला असता त्या माणसाला. कुठे नेतोय आपण? आज ही परिस्थिती बघायला बाळासाहेब नाहीत यापेक्षा चांगली गोष्ट नाही. ज्या गोष्टी शून्यातून उभ्या केल्या. बाहेरच्या पक्षात बघा, अनेक लोक दिसतील की जे बाळासाहेबांनीच निर्माण केली होती.
“BJP Never Imagined It, Balasaheb Proved Hindu Power,” Raj Thackeray Takes Aim
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ निर्दोष; ईडी मनी लॉन्डरिंग केसला पूर्णविराम
- गुजरातच्या दारूबंदीच्या धर्तीवर गुटखा बंदीसाठी स्वतंत्र कायदा, नरहरी झिरवाळ यांची माहिती
- उध्दव ठाकरे यांच्या शिवसैनिकाला महापाैरपदासाठी पाठिंबा द्या, भास्कर जाधव यांचे एकनाथ शिंदे यांना आवाहन
- महापालिकांमध्ये महापौर-उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर ; महिनाअखेरीस सत्तास्थापना