विशेष प्रतिनिधी
मुंबई : Harshvardhan Sapkal कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईतील गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी बरळल्याने जोरदार टीका होत आहे. सरकारवर टीका करत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना नथुराम गोडसे यांच्यासोबत केली होती. यावर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून नवनाथ बन यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांचे वक्तव्य म्हणजे निर्लज्जपणा आणि नालायकपणाचा कळस, अशी टीका बन यांनी केली आहे.Harshvardhan Sapkal
नवनाथ बन म्हणाले, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवाभाऊंवर अतिशय खालच्या पातळीची टीका केली आहे. हा हर्षवर्धन सपकाळ यांच्या नालायक पणाचा आणि निर्लज्जपणाचा कळस आहे. एका बाजूला महात्मा गांधीचे नाव घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने नथुराम गोडसेंबरोबर तुलना करायची याबद्दल सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे.Harshvardhan Sapkal
पुढे बोलताना नवनाथ बन म्हणाले, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ हे गोडसे नाही तर महाराष्ट्रात गोडवा निर्माण करणारे नेतृत्व आहे. त्यामुळे जनतेने एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळा देवा भाऊंना निवडून दिले आहे. हर्षवर्धनजी तुम्ही अशा पद्धतीचा नीचपणा करणार असाल तर जनता आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला जशास तसं उत्तर देतील, असा इशारा नवनाथ बन यांनी दिला आहे. महात्मा गांधींचे नाव देखील घ्यायची तुमची लायकी नाही आणि तुम्ही नथुराम गोडसेंसोबत तुलना करत आहात, तुम्हाला लाज वाटली पाहिजे.Harshvardhan Sapkal
हर्षवर्धन सपकाळ यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या ओबीसी-मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ओबीसी समाजाचे आरक्ष वाढवण्यात यावे अशी आमची मागणी आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. असे असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस जाणूनबुजून जातीपातीत, धर्मा-धर्मात भांडण लावत आहेत. हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने मुद्दा उपस्थित करत आंदोलकांना दुसऱ्यांदा गुलाल उधळून वापस पाठवले. ते करत असताना त्यांनी टायमिंग जे साधले आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे साधले आहे.
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, निवडणुका आल्या की महाराष्ट्रातले जातीय राजकारण हे खंगाळून, ढवळून द्यायचे आणि त्यात फोडा-तोडा आणि राज्य करा ही इंग्रज सरकारची जी भूमिका आहे त्या भूमिकेला भाजप हे सातत्याने कित्ता गिरवत असते. तेलंगणमध्ये जातीनिहाय जनगणना झाली आणि ओबीसींना 42 टक्के आरक्षण देण्यात आले. हे संदर्भ जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस का लागू करत नाहीत? देवेंद्र फडणवीस हे भांडण लाऊन देतात आणि जसे नथुराम गोडसेंनी शांत डोक्याने महात्मा गांधीजींचा खून केला, तशाच शांत पद्धतीने देवेंद्र फडणवीस भांडण लाऊन बाजूला उभे राहतात.
Congress State Chief Rants, Compares CM Fadnavis to Nathuram Godse
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना