विशेष प्रतिनिधी
मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूवर कुणीही पतंगबाजी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अशा घटना घडतात तेव्हा आपण कोणतीही पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न करू नये. हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असतो. या प्रकरणी आपण मृत व्यक्तीच्या पद व प्रतिष्ठेचा तथा त्याच्या कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेचाही विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.Devendra Fadnavis
अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार हा अपघात नसून, घातपात असल्याचा आरोप करत आहेत. विशेषतः शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या दुर्घटनेविषयी काही महत्त्वपूर्ण खुलासे व पुरावे सादर करून या प्रकरणात घातपाताचा संशय असल्याचा ठाम दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना उपरोक्त आवाहन केले आहे.Devendra Fadnavis
मुख्यमंत्री म्हणाले, आमदार रोहित पवार यांनी माझी भेट घेऊन काही मुद्दे मांडले. त्यांनी दिलेल्या पत्राला मी माझे पत्र जोडून डीजीसीएकडे या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहे. पण अशा घटना घडतात तेव्हा आपण कोणतीही पतंगबाजी करू नये. कारण, हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असतो. दुर्दैवाने जी व्यक्ती मृत आहे, त्या व्यक्तीच्या पद व प्रतिषेठाचा आपण विचार केला पाहिजे. विशेषतः त्याच्या कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेचाही या प्रकरणी विचार झाला पाहिजे. त्यामुळे या प्रकरणी कोणतीही पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार करू नये असे मला वाटते. या प्रश्नावर याहून अधिक मी बोलू इच्छित नाही.Devendra Fadnavis
मुख्यमंत्र्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण तथा सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी करण्यात आलेल्या कथित घाईच्या मुद्यावरही भाष्य केले. तसेच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा आमचा नव्हे तर राष्ट्रवादीचा होता असेही स्पष्ट केले. ते म्हणाले, सुनेत्रा पवार यांच्याविषयी घेण्यात आलेल्या निर्णयात आमच्या पक्षाचा कोणताही सहभाग नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी त्याची माहिती आम्हाला दिली. ते कागदपत्रांसह माझ्याकडे आले. त्यांनी एक तारीख दिली. त्यावर माझा कोणताही आक्षेप नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती केली आणि आम्ही ती मान्य केली. तो निर्णय त्यांच्या पक्षाचा होता. आमचा नव्हता.Devendra Fadnavis
“No Kite-Flying Politics Over Ajit Pawar’s Plane Accident: Chief Minister Devendra Fadnavis Appeals
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या.