Javed Akhtar : “मी आणि शबाना फुटपाथवर झोपतो का?” पाकिस्तानच्या बुशरा अन्सारीला जावेद अख्तर यांचे रोखठोक प्रत्युत्तर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Javed Akhtar ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी पुन्हा एकदा आपल्या परखड आणि विनोदी शैलीत पाकिस्तानची अभिनेत्री बुशरा अन्सारी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. एका मुलाखतीत बोलताना जावेद अख्तर म्हणाले, “हो, मी आणि शबाना आजकाल फुटपाथवर झोपतो!Javed Akhtar

बुशरा अन्सारी यांनी नुकतेच जावेद अख्तर यांच्या पहलगाम हल्ल्यावरील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, “तुम्ही नसीरुद्दीन शहा यांच्यासारखे गप्प का बसत नाही? त्यांना मुंबईत घर भाड्यानेही मिळत नाही.” या वक्तव्यावर उत्तर देताना जावेद म्हणाले, “माझ्या २५ अडचणी असतील, पण तिच्याशी तुलना करता मी सर्वप्रथम भारतीय आहे.”

ते पुढे म्हणाले, “शबानाने २५ वर्षांपूर्वी एक फ्लॅट खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता, पण तिला मुस्लिम असल्याचं कारण देत नाकारण्यात आलं. हे लोक कोण होते? त्यांचे वडील-सुहृद सिंधहून भारतात आले होते, फाळणीच्या वेळी निर्वासित झाले होते. त्यांच्या जखमा खोल होत्या आणि ती कटुता त्यांनी आमच्यावर उतरवली. पण याला जबाबदार कोण आहे?”

पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांनी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात भाषण करताना केंद्र सरकारला कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. “सीमेवर फटाके वाजवणं पुरेसं नाही. आता काहीतरी ठोस करा. पाकिस्तानचा वेडसर आर्मी चीफ जसे वकृत्व करतो, तसं पुन्हा करण्याची हिंमत त्याच्यात उरू नये,” असं म्हणत त्यांनी सरकारला आव्हान दिलं.

यापूर्वीही मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातलं स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी पाकिस्तान आणि नरक यापैकी निवड करावी लागली, तर “मी नरकात जाणं पसंत करीन,” असं वक्तव्य जावेद अख्तर यांनी केले होते. माझ्यावर दोन्ही बाजूंनी टीका होते. एक गट मला ‘काफिर’ म्हणतो आणि म्हणतो की मी नरकात जाईन. दुसरा गट मला ‘जिहादी’ म्हणतो आणि सांगतो की मी पाकिस्तानात जावं. जर माझ्याकडे फक्त पाकिस्तान आणि नरक असे दोनच पर्याय असतील, तर मी नरकात जाणं पसंत करीन, असे ते म्हणाले होते.

“Do Shabana and I sleep on the pavement?” Javed Akhtar’s sharp response to Pakistan’s Bushra Ansari

महत्वाच्या बातम्या