विशेष प्रतिनिधी
मुंबई: Navnath Ban महाराष्ट्र कुणीही हिरवा करु शकत नाही. औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला त्याने महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न केला, अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला त्याने प्रयत्न केला, पण हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा महाराष्ट्र आहे, असे कितीही औरंगजेबाचे फॅन आले तरी महाराष्ट्र हिरवा होणार नाही, इथे औरंगजेब किंवा अफजल खान यांचा उदो-उदो चालणार नाही, इथे केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकारच चालेल हे जलील यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिला आहे. Navnath Ban
नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्रात बिहार भवन होत असेल तर संजय राऊत आणि कुणाच्या पोटात दुखण्याचे काहीच काम नाही. अयोध्येमध्ये आपले महाराष्ट्र भवन आहे. जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन सुरू होतंय, उद्या पाटण्यात ही महाराष्ट्र भवन सुरू होईल, संजय राऊत यांनी काळजी करू नये. ही सांस्कृतिक देवाण घेवाण नाही. Navnath Ban
नवनाथ बन म्हणाले की, काही स्थानिक नेत्यांनी युती केली नाही त्यामुळे शिवसेना-भाजप वेगवेगळे लढत आहे. जर भरत गोगावले असे म्हणत असतील की भाजपवर विश्वास नाही तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना जाऊन विचारले पाहिजे की भाजपवर विश्वास आहे का नाही. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आम्ही महायुतीम्हणून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहोत. भरत गोगावले यांच्या जिल्ह्यात विधानसभेच्या वेळी त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य केले होते.आमच्या कार्यकर्त्यांनी आपले काम केले त्यामुळे तुम्ही निवडून आला होतात. त्याच पद्धतीने शिवसेनेने भाजपच्या उमेदवारांचे काम केले. एकमेकांना सहकार्य करण्याच्या विचारातून महायुती काम करते याचे भान भरत गोगावले आणि सर्वांनी ठेवले पाहिजे.
नवनाथ बन म्हणाले की, निवडणूक आता संपलेली आहे त्यामुळे भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप-प्रत्यारोप करणे काही योग्य नाही. प्रत्येकाने काम केल्याने महायुतीला राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी मोठे यश आले आहे.काही ठिकाणी थोड्या फार मताने पराभव होतो पण त्यामुळे कोणावर आरोप-प्रत्यारोप न करता आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे. आता मागचा काळ पुन्हा येणार नाही. मुंबईकरांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. फडणवीस-शिंदे हे दोन्ही नेते महाराष्ट्राना पुढे नेत आहेत.
नवनाथ बन म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये गेले तिथून मागच्यावेळी आणलेल्या गुंतवणुकीचे काम सुरू आहे, रोजगार निर्मिती झाली आहे. यावेळी देखील 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना याबद्दल आनंद वाटायला हवा. राहुल गांधी यांचे वक्तव्य काय करतात हे तुम्हाला माहिती आहे, ते तरुणांचा अपमान करतात त्याकडे चव्हाण यांनी लक्ष दिले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात गुंतवणूक येत आहे.
Glorification of Aurangzeb or Afzal Khan Will Not Be Tolerated,” Warns Navnath Ban
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ निर्दोष; ईडी मनी लॉन्डरिंग केसला पूर्णविराम
- गुजरातच्या दारूबंदीच्या धर्तीवर गुटखा बंदीसाठी स्वतंत्र कायदा, नरहरी झिरवाळ यांची माहिती
- उध्दव ठाकरे यांच्या शिवसैनिकाला महापाैरपदासाठी पाठिंबा द्या, भास्कर जाधव यांचे एकनाथ शिंदे यांना आवाहन
- महापालिकांमध्ये महापौर-उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर ; महिनाअखेरीस सत्तास्थापना