विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nitesh Rane एमआयएमच्या नावाखाली तुमच्या हिरव्या सापांची वळवळ झाली. तुम्हाला आमच्या राज्यात येऊन वातावरण खराब करायचं असेल, तर पुढे सरकार म्हणून सभा हाेऊ द्यायच्या का?” याचा विचार करावा लागेल” असा इशारा भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी दिला.Nitesh Rane
अहिल्यानगर येथे झालेल्या एमआयएमच्या सभेत नितेश राणे यांच्यावर टीका करण्यात आली हाेती. त्याला उत्तर देताना राणे म्हणाले, भोकने वाले कुत्ते काटते नही, ही जी हिंदीत म्हण आहे, याचं उत्तम उदहारण कालची सभा होती. तुम्ही एकाबाजूला म्हणता आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो, कायदा-सुव्यवस्था मानतो. पण दुसऱ्याबाजूला महाराष्ट्र सरकारने अहमदनगरच नाव बदलून अहिल्यानगर केलं, औरंगाबादच नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं, ते तुम्हाला मान्य नाही. हे काय तुमच्या अब्बाचं पाकिस्तान, इस्लामाबाद आहे का?. शरीया कानून लागू आहे का?”Nitesh Rane
“ज्यांच्या विचारातून ही पिल्लावळ मोठी झाली आहे, ते मूळ रझाकार स्वातंत्र्याच्या विरोधात होते. एमआयएमच्या नावाखाली तुमच्या हिरव्या सापांची वळवळ झाली. तुम्हाला आमच्या राज्यात येऊन वातावरण खराब करायचं असेल, तर पुढे सरकार म्हणून सभा व्हायला द्यायच्या का?” याचा विचार करावा लागेल” असा इशारा देत नितेश राणे म्हणाले, सगळीकडे आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लावून त्या आडून धमकावत असाल तर चिंता करु नका. राज्यात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे. देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत. आम्हाला तिसरा डोळा उघडायला लावू नका.
राणे म्हणाले, ही भूमी महादेवाची आहे. आपल्या प्रत्येकाच्या श्वासात महादेव आहेत. हिंदू राष्ट्रात आय लव्ह महादेव लिहिणार नाही तर अजून काय लिहिणार? एम फॉर महाराष्ट्र, एम फॉर महादेव, एम फॉर मुंबई सरळ स्पष्ट आहे, आमच्या हिंदू राष्ट्रात आय लव्ह महादेव चालणार. मी पाकिस्तान, इस्लामाबाद, कराचीमध्ये बसून आय लव्ह महादेव लिहिलेलं नाही. मी आमच्या भारतात हिंदू राष्ट्रात, हिंदुत्ववादी विचारांच्या महाराष्ट्रात बसून आय लव्ह महादेव लिहिलय. त्यात काही चुकीचं नाही.
Green snakes are moving in the name of MIM, why should we consider allowing the meeting again, warns Nitesh Rane
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा