मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून महायुतीत फूट; संजय निरुपम सरकविरोधात रस्त्यावर उतरणार

विशेष प्रतिनिधी

पुणे: राज्यातील महायुती सरकाकडून रिक्षा – टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र,या निर्णयावरून महायुतील घटक पक्षांतील नेत्यांनीच आता सरकारला घरचा आहेर दिला आहे.शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी या निर्णयाला विरोध दर्शवत सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा घेतला आहे.

२०१९ मधील निर्णयाची अंमलबजावणी अजून कडक करण्याचा निर्णय सरकाने घेतला आहे.या निर्णयानुसार,१ मे पासून राज्यातील रिक्षा, कॅब, टॅक्सी, ओला,उबर आणि इ- बाइक टॅक्सी चालकांना मराठी भाषेत बोलणे अनिवार्य असेल.यासाठी त्यांची एकप्रकारे चाचणी सरकाकडून घेण्यात येणार आहे,ज्या चालकांना मराठी बोलता येणार नाही,त्यांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत.

संजय निरुपम म्हणाले की,’ महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांचा मनात सरकारविषयी खदखद आहे.१ मे पासून राज्यातील सर्व रिक्षा – टॅक्सी चालकांची मराठी भाषेची चाचणी घेतली जाणार आहे.जे चालक मराठी बोलू शकत नाहीत,त्यांचे परवाने जप्त केले जातील,अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे आणि सर्वांनी मराठी बोलली पाहिजे, या आग्रहाबद्दल आम्ही सरकारचा आदर करतो.पण रिक्षाचालकांवर अशी सक्ती करणे हा अन्याय आहे’. असं संजय निरुपम यांनी स्पष्ट केलं.



संजय निरुपम यांचा आंदोलनच इशारा

निरुपम म्हणाले की, ‘ प्रवाशांशी प्राथमिक मराठी बोलता येणे ठीक आहे,पण चालकांना मराठी लिहिता – वाचता येणे बंधनकारक असावे, ही अपेक्षा चुकीची आहे.या अन्याय विरोधात मी स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी बोलणार आहे. जर सरकारकडून हा निर्णय बदलण्यात आला नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार आहे’.

Mahayuti split over Marathi compulsion issue; Sanjay Nirupam to take to the streets against Sarkar

महत्वाच्या बातम्या