Nitin Gadkari : दुचाकी वाहनांवर टोल कर लादण्याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या, नितीन गडकरी यांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Nitin Gadkari  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दुचीकीवरील टोलच्या चर्चा फेटाळल्या आहेत. त्यांनी ट्वीट करताना म्हटले की, काही प्रसारमाध्यमे दुचाकी वाहनांवर टोल कर लादण्याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवत आहेत. परंतु असा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही.Nitin Gadkari

पथकराच्या नियमामध्ये काही बदल झाल्यावर आता दुचाकी वाहनांवरही कर लागणार असल्याच्या काही कथित बातम्या प्रसारमाध्यमांमधून समोर येत आहेत. 15 जुलैपासून दुचाकी वाहनांना टोल लागेल, अशी चर्चा काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत होती. या चर्चांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. काही वाहतूक संघटनांनी यावर नाराजी व्यक्त केली आणि सरकारला भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. यावर नितीन गडकरी यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, सरकार दुचाकी वाहनांवर टोल लावण्याचा विचार करत नाही.

यावर गडकरी म्हणाले, दुचाकी वाहनांना टोलवर पूर्णपणे दिलेली सूट यापुढेही सुरूच राहील. सत्यता न पडताळता दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवून खळबळ उडवणे हे चांगल्या पत्रकारितेचे लक्षण नाही. मी या सगळ्याचा निषेध करतो.

या फेक न्यूजवर रोहित पवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, 15 जुलैपासून दुचाकी वाहनांना देखील टोल लागू करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. जर असं असेल तर सरकारने आता पायी चालणाऱ्यांकडून देखील टोल घ्यायला हवा किंबहुना या मार्गावरून उडणाऱ्या पक्षांनाही टोलच्या कक्षेत कसं आणता येईल, यासाठी एक अभ्यास समिती स्थापन करावी, जेणेकरून शासकीय तिजोरी वेगाने भरेल.

Misleading news regarding imposition of toll tax on two-wheelers, Nitin Gadkari clarifies

महत्वाच्या बातम्या