विशेष प्रतिनिधी
मुंबई : Prithviraj Chavhan काँग्रेस पक्षात काहीच जबाबदारी नसल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सध्या गुप्तहेरीच्या सुरस कथा वाचताहेत काय अशी शंका येऊ लागली आहे. याचे कारण म्हणजे त्यांनी एक कॉन्सपीरसी थेयरी मांडत इस्त्रायली गुप्तहेराचे स्टिंग ऑपरेशन अन् भारताच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस असे अनेक दावे केले आहेत.Prithviraj Chavhan
येत्या 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार आहे. अमेरिकेतील एका इस्त्रायली गुप्तहेराने केलेल्या स्टिंग ऑपरेशनची माहिती बाहेर येणार असून, त्यामुळे अनेक बडे नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. या वादळात कदाचित भारताचा पंतप्रधान बदलून त्या जागी एखादा ‘मराठी माणूस’ पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो,” असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.Prithviraj Chavhan
पिंपरी-चिंचवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो’, या ट्वीटचा सविस्तर खुलासा केला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “”जगात बरेच काही चालले आहे. मध्यंतरी मी एक ट्वीट केले होते. ते ट्वीट खूप व्हायरल झाले होते. मी म्हटले होते की, कदाचित महिन्याभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल. मला अनेकांचे फोन आले. याचा अर्थ काय आहे. कोण म्हटले तुम्ही होणार आहात का? तर कुणाला याची पार्श्वभूमी माहिती नव्हती. आता मराठी माणूस होणार म्हणजे, आता बसलेल्या माणसाला बाजूला व्हावे लागेल, मी आधीच अधोरेखीत केले आहे, नाव न घेता. बहुतेक बदल घडण्याची शक्यता आहे. बदल घडला तरी काँग्रेसचा माणूस हा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे तेवढं बहुमत नाही. सत्तेत असलेल्या लोकांपैकीच कोणीतरी होईल आणि तो कदाचित ‘मराठी माणूस’ असू शकतो. 19 डिसेंबरला हे घडेल, असा माझा अंदाज आहे.”
या राजकीय भूकंपामागे आंतरराष्ट्रीय कारण असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, “अमेरिकेत एक ‘अॅमस्टिन’ नावाचा माणूस होता, जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने मोठमोठ्या बंगल्यांमध्ये कॅमेरे लावून लोकांचे खाजगी क्षण टिपले आहेत. अमेरिकन संसदेने कायदा केला असून, त्यावर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सही आहे. त्यानुसार 19 डिसेंबरला या प्रकरणातील 75 हजार फोटो आणि 20 हजार ई-मेल्सचा डेटा जाहीर होणार आहे. हा डेटा सर्च करता येणार असून, यात कितीही मोठा माणूस असला तरी त्याला संरक्षण मिळणार नाही, असे अमेरिकन संसदेने स्पष्ट केले आहे.”
“या माहितीत नेमकं कोणाकोणाचं नाव आहे आणि त्यांनी काय पराक्रम केले आहेत, हे 19 डिसेंबरला जगासमोर येईल. सोशल मीडियावर काही नावे चर्चिली जात आहेत. त्यामुळे मोठा बदल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आशा आहे, काही तरी होईल, हे ठरवून आम्ही पुढे चाललो आहे,” असे चव्हाण म्हणाले.
Prithviraj Chavhan’s Wild Conspiracy Theory: Israeli Spy Sting and a Marathi PM Plot
महत्वाच्या बातम्या
- राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवण्यासाठी काँग्रेस आक्रमक, नाना पटोले मांडणार ठराव
- Padalkar–Awhad : पडळकर – आव्हाड राड्यात कार्यकर्त्यांना शिक्षा, समितीने केली कारवाईची शिफारस
- चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का
- निवडणूक 20 दिवस पुढे ढकलून निकाल फिरवण्याचे काम, विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर आरोप