विशेष प्रतिनिधी
मुंबई : Parth Pawar पुण्यातील मुंढवा येथील शासकीय जमिनीची पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला विक्री केल्याप्रकरणी राज्य सरकारने चौकशीसाठी नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समितीला एक महिन्याची मुदतवाढ देऊन 6 जानेवारीला अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र हा अहवाल अद्यापही पूर्ण न झाल्याने या समितीला आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.Parth Pawar
पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राइजेस एलएलपी कंपनीने मुंढवा येथील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या ताब्यात असलेली चाळीस एकर शासकीय जमीन खरेदी केली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली 6 नोव्हेंबर रोजी समिती नियुक्त केली. या समितीमध्ये विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तसेच सदस्य सचिव म्हणून सत्यनारायण बजाज यांचा समावेश आहे.Parth Pawar
या समितीला महिनाभरात अर्थात 6 डिसेंबरपर्यंत अहवाल देण्यास सांगितले होते. त्यानंतर या समितीला 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यासंदर्भात विभागीय आयुक्तांना बैठकीसाठी बोलाविण्यात आले होते. या बैठकीनंतर अहवाल सादर करण्यास आणखी वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आता आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग, महसूल विभाग तसेच जमाबंदी विभाग या तिन्हींशी संबंधित हे प्रकरण असल्यामुळे त्याबाबतचा सविस्तर अहवाल खारगे समितीकडून येणार असून अहवालानंतर या विभागांनी नोंदणी करताना काय काळजी घ्यावी, त्याबाबत मार्गदर्शक नियमावली तयार केली जाण्याची शक्यता आहे.
पुण्यातील मुंढवा गावातील कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमिनीचा व्यवहार अवघ्या 300 कोटी रुपयांमध्ये झाला. वास्तविक या जमिनीचे बाजारमूल्य 1804 कोटी रुपये आहे. तरीही कागदोपत्री 300 कोटी रुपये दाखवले आहेत. शिवाय आयटी धोरणाचा फायदा घेत मुद्रांक शुल्क माफ करून घेतल्याचा पार्थ पवार यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे या जमीन व्यवहारप्रकरणी पार्थ पवार वगळता 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Probe Panel Gets One-Month Extension in Parth Pawar–Linked Mundhwa Land Deal Case
महत्वाच्या बातम्या
- प्रभाग २५ मध्ये भाजपा उमेदवारांचा घरोघरी संपर्क दौरा
- तुमको मिर्ची लगी तो मै क्या करू, बिनविराेधवरील टीकेवर मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबाेल
- Ashish Shelar : सावरकरांचे विचार मान्य असतील तर तुमच्या बरोबर, आशिष शेलार यांचा अजित पवारांना इशारा
- छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे ! केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांच्या विधानाने महाराष्ट्रात संताप