MNS-Thackeray : मनसे – ठाकरे गट युतीबाबत अमित ठाकरे म्हणाले, त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, दोन भावांनी बोललं पाहिजे

विशेष प्रतिनिधी

मुंबई : MNS-Thackeray दोन भावांनी बोललं पाहिजे. त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी माणसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चेवर दिली आहे. दोन्ही पक्ष एकत्र येण्यात आम्हाला काही प्रश्न नाही असेही ते म्हणाले. MNS-Thackeray

मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युतीवर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे म्हणाले, “माझी भूमिका एवढीच आहे की, दोन भावांनी बोललं पाहिजे. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन भाऊ एकत्र येण्यात मला काही इश्यू नाही. मी २०१४, २०१७ ला बघितलंय, कोरोना काळातही पाहिलंय, कोरोनात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा राज साहेबांनी उद्धवजींना पहिला फोन केला होता. हा भीषण आजार आहे. त्यामुळे कोणतंही सरकार असो, आपण साथ दिली पाहिजे असं म्हटलं होतं. त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून युती होत नाही. त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात.

ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे याबाबत बोलताना म्हणाले होते की , आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिला आहे. आमची भावना व्यक्त केली आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्यासोबत यायला तयार असेल, त्यांना आम्ही बरोबर घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. अलिकडेच आमचे नेते दीपेश म्हात्रे व मनसेचे नेते राजू पाटील यांनी एकत्र येऊन आंदोलन केले. हे त्याचेच उदाहरण आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आमचे मन साफ आहे. जो कोणी नेता महाराष्ट्र हितासाठी आमच्याबरोबर यायला तयार असेल, जो पक्ष पुढे येत असेल, आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र येऊन लढू.

मनसेसोबत यतीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मराठी माणसाचा विचार घेऊन राज ठाकरे यांनी स्वतंत्र संघटन उभे केले आहे. महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत. आमचे नेते मनसेबरोबरच्या युतीबाबत एका सुरात बोलत आहेत. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि आम्ही सर्वजण एका सुरात बोलत आहोत. त्यावर कोणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही. आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ व स्पष्ट आहेत.

Regarding the MNS-Thackeray faction alliance, Amit Thackeray said, they have each other’s numbers, the two brothers should talk

महत्वाच्या बातम्या