Sharad Pawar : शरद पवारांची नवी राजकीय खेळी ? सत्ताधाऱ्यांबरोबर की विरोधकांसोबत? निर्णय सुप्रिया सुळे यांच्यावर!

Sharad Pawar : शरद पवारांची नवी राजकीय खेळी ? सत्ताधाऱ्यांबरोबर की विरोधकांसोबत? निर्णय सुप्रिया सुळे यांच्यावर!

Sharad Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या या विधानांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथीचे संकेत दिले आहेत. संसदेत सत्ताधारी पक्षासोबत बसायचे की विरोधी बाकांवर, याचा निर्णय सुप्रिया सुळे यांना घ्यायचा आहे, असे स्पष्ट करत आमच्यातील एका गटाला अजित पवार यांच्यासोबत जाणे योग्य वाटते, अशी कबुली दिली आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, “आमच्यातील एका गटाला अजित पवार यांच्यासोबत जाणे योग्य वाटते. अशा स्थितीत संसदेत नेमकी भूमिका घ्यायची आहे ती सुप्रिया सुळे ठरवतील. सुप्रिया आणि अजित यांनी एकत्र बसून हा निर्णय घ्यावा.पक्ष उभा करताना जे आज बाजूला गेले, ते सगळे एकत्र होते. सगळ्यांची विचारधारा एकच आहे. त्यामुळे भविष्यात सगळे एकत्र आले तरी मला त्यात आश्चर्य वाटणार नाही.

शरद पवार यांनी स्पष्ट केले की, “मी सध्या पक्षाच्या थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी नाही. आमदारांमध्ये अस्वस्थता असू शकते, मात्र निर्णय घेण्याचे अधिकार जयंत पाटील यांच्याकडे आहेत. आमचे सर्व खासदार मात्र एकमताचे आहेत.”

देशातील राष्ट्रीय स्तरावरच्या इंडिया आघाडीविषयी बोलताना पवार म्हणाले, “सध्या इंडिया आघाडी फारशी सक्रिय नाही. त्यामुळे आमच्या पक्षाची पुनर्रचना आवश्यक आहे. नव्या पिढीला पुढे आणून पुन्हा मजबूत पायाभूत संघटना उभी करावी लागेल.”

“भाजपला पर्याय उभा करण्याचा आमचा विचार”
शेवटी शरद पवार यांनी स्पष्ट केले की, “आमचा विचार विरोधी बाकांवर बसण्याचा आहे. भाजपला एक मजबूत व विश्वासार्ह पर्याय देशासमोर उभा केला पाहिजे. त्यासाठी आम्ही नव्याने उभारणी करणार आहोत.”

Sharad Pawar new political move? With the ruling party or with the opposition? The decision is up to Supriya Sule!

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023