Shiv Sena : शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर प्राणघातक हल्ला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Shiv Sena मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच बांद्रा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर प्रचारादरम्यान अज्ञाताने जीवघेणा हल्ला केला आहे. हल्लेखोराने कुरेशी यांच्या पोटात थेट चाकू भोसकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.Shiv Sena

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, या प्रचाराच्या दरम्यान काही गुन्हेगारी स्वरुपाच्या धक्कादायक घटना घडत असल्याचे समोर येत आहे. नेते कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. अशातच मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. वांद्रे परिसरात प्रचार सुरु असतानाच शिवसेना उमेदवारावर चाकू हल्ला झाला आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक 92 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर चाकू हल्ला झाला आहे.Shiv Sena



मिळालेल्या माहितीनुसार, हाजी सालीन कुरेशी हे बांद्रा येथील ज्ञानेश्वर नगर परिसरात आपल्या समर्थकांसह घरोघरी जाऊन प्रचार करत होते. यावेळी मतदारांच्या भेटीगाठी घेत असतानाच गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात इसमाने त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपीने अत्यंत क्रूरपणे कुरेशी यांच्या पोटात धारदार चाकू खुपसला आणि तिथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुरेशी यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने जवळच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले.

या घटनेमुळं वांद्रे परिसरामध्ये भीतीच्या आणि तणावाच्या वातावरण निर्माण झाला आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत हल्ला करणारा व्यक्ती कोण होता. हल्ला करण्याच्या मागे हेतू काय होता. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षाचे दिग्गज राजकीय नेते प्रचारात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या प्रतारादरम्यान, राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच काही ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना देखील घडताना दिसत आहेत. काही भागात हल्ले होत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाला असून माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानंतर आज मुंबईत देखील देखील शिवसेनेच्या उमेदवारावर हल्ला करण्यात आला आहे.

Shiv Sena (Shinde Faction) Candidate Haji Salin Qureshi Attacked in Bandra

महत्वाच्या बातम्या