विशेष प्रतिनिधी
परळी : Dhananjay Munde फक्त माझं राजकारणच नाही तर मलाच संपायच्या मागे लागले आहेत.मात्र,अशा वेळेला तुम्ही माझ्यासोबत राहणार की माझी साथ सोडणार? ज्या लोकांनी परळीला बदनाम केले त्या लोकांना उत्तर देण्यासाठी ही निवडणूक आहे, अशी भावनिक साद माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी परळीकरांना घातली.Dhananjay Munde
परळी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर बरकतनगर भागात बोलताना ते म्हणाले, नगरपरिषद निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तुमची प्रत्येक अडचणी ही माझी अडचण म्हणून मी सोडवली आहे. कोणतीही गडबड करू नका. कारण फक्त माझं राजकारणच नाही तर मला देखील संपवायच्या मागे लागले आहेत. पण, अशा वेळेला तुम्ही माझ्यासोबत राहणार की माझी साथ सोडणार? ज्या लोकांनी परळीला बदनाम केले त्या लोकांना उत्तर देण्यासाठी ही निवडणूक आहे. असं म्हणत मुंडे यांनी परळीत भाननिक साद घातली आहे.Dhananjay Munde
धनंजय मुंडे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळेला जे वातावरण होते तेच वातावरण आता नगरपरिषद निवडणुकीत आहे. आज तुम्ही मला शेर म्हणाले म्हणून मी माझ्या भाषणात शेर म्हणणार नाही. मी माझी जबाबदारी या ठिकाणी नेहमीच बजावली आहे. नगरपरिषदेकडून मला आयटीआय सुरू करायचं आहे. यामुळे रोजगाराला मदत होणार आहे. अतिक्रमण नियमित करून घरकुल देण्याचे काम आपण केले आहे. मी नेहमीच तुमच्या कामाला आलो आहे. तुम्ही माझ्या दरवाजात काम घेऊन आलात आणि तुम्ही रिकाम्या हाताने परत गेलात, असं कधीच झालं नाही. आपले मत वाया जाऊ देऊ नका. नगरपरिषद निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे.
“They Are Not Just Targeting My Politics, They Want to Finish Me”, Dhananjay Munde’s Emotional Appeal to Parli Residents
महत्वाच्या बातम्या
- भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी
- Dilip Walse Patil : माझं राज्यातल वजन थोडं कमी झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली खंत
- ‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका
- Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा काढली खोडी, टी-शर्टवर कुत्र्याचा फोटो आणि ‘RSS’ सारखे दिसणारे अक्षर