विशेष प्रतिनिधी
मुंबई: साधू संत, बागेश्वर बाबा यांचे हिंदूत्व नाही असे मुक्ताफळे संजय राऊत उधळत आहेत. राऊतांच्या हिंदूत्वाची व्याख्या काय आहे? याकूब मेमन कबर सुशोभीकरण, नमाज पठण स्पर्धा, जनाब बाळासाहेब ठाकरे उल्लेख करणे हे तुमचे हिंदुत्व आहे का? तुम्ही साधू संताचा अपमान करत आहात, जनता तुम्हाला माफ करणार नाही. राऊत मतांसाठी दाढ्या कुरवाळत बसलेत. असा हल्लाबोल भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे.
नवनाथ बन म्हणाले की, तुमचे हिंदूत्व बेगडी आहे, तुम्ही सत्तेसाठी काँग्रेससमोर झुकलात, तुम्ही सत्ता मिळावी म्हणून तुमचे हिंदूत्व विकून टाकले.वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार पायदळी तुडवले, आणि आता अफजल खानाच्या दाढ्या कुरवळत आहात. नमाज पठण, अजान स्पर्धा घेणे तुमचे हिंदूत्व आहे का? असा सवाल बन यांनी केला आहे. बागेश्वर बाबा असोत की साधू संत त्यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करत नाही. पण ते हिंदूत्वाची भूमिका मांडत आहे. पण राऊत मतांसाठी दाढ्या कुरवाळत बसलेत.
नवनाथ बन म्हणाले की, मंगलप्रभात लोढा यांनी केईएमच्या नामांतराचा मुद्दा उचलला कारण इंग्रजांच्या खुना पुसल्या पाहिजे म्हणून एकलव्य रुग्णालय करा म्हटल्याने संजय राऊतांच्या पोटात का दुखले? इंग्रजांच्या खुना पुसण्याचे काम 70 वर्षांमध्ये झाले नसेल आणि आता जर ते होत असेल तर तुम्हाला पोटदुखी का? असा सवाल बन यांनी केला आहे. गुलामगिरीच्या खुना पुसण्यासाठी नामांतर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण राऊतांना गुलामगिरी करण्याची सवय असल्याने ते नाव बदलण्यास विरोध करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज असते तर सर्वात पहिले तुमचा कडेलोट झाला असता. ज्या पद्धतीने तुमच्या गुंड टोळ्या पाटकर ताईंना धमक्या देण्याचे काम करत आहेत. महाराज असते तर तुमचा चौरंग केला असता. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही थकले नाहीत, पण अडीच वर्षे कारभार करत कोण थकले आणि झुकले हे सर्वांना माहिती आहे. आपल्या नेत्यांची काय अवस्था आहे हे बघा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्ररी असताना रोज सुटी घेत होते केवळ अडीच दिवस मंत्रालयात आले, पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण वेळ जनतेची सेवा करतात, असेही त्यांनी सांगितले.
नवनाथ बन म्हणाले की,दिल्लीसमोर कोण झुकले आहे हे बघायचे असेल तर उद्धव ठाकरेंकडे पाहिले पाहिजे. तुम्ही सत्तेसाठी दिल्लीसमोर वाकले, झुकले आणि पार लोटांगण घातले. अन् महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद घेतले. भाजप असो की भाजपचे कार्यकर्ते ते महाराष्ट्राचा सन्मान करतात. उद्धव ठाकरेंना हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध केला नाही.त्यांनी टिूप सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती, त्यावेळी शिवरायांचा अपमान झाला नाही का?
What is Raut’s definition of Hindutva while appeasing for votes? Navnath Ban launches sharp attack
महत्वाच्या बातम्या
- पुण्याच्या सौंदर्याचा ‘बळी’ देऊन मलिदा लाटण्याचा डाव; १५ वर्षांत कोट्यवधींच्या उलाढालीचे नियोजन!
- नाशिक पाठोपाठ मुंबईत कॉर्पोरेट जिहाद, तरुणीचा अश्लील मेसेजद्वारे छळ
- भाजपाची ३० उमेदवारांची यादी तयार! दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; “या”नावांचा समावेश..
- janaakrosh rally : जनआक्रोश रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल