अखेर काँग्रेसचे ठरले ! मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार, चेन्नीथला यांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील काँग्रेसच्या कट्टर समर्थकांची मते कुठेही जाणार नाहीत. मात्र मनसेला सोबत घेऊन मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली तर दलित, उत्तर भारतीय, मुस्लिम मतदारांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. त्यामुळ े मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेस पक्षान घेतला आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा आहे. Chennithala

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, मुंबई काँग्रेसचे प्रभारी यू. बी. वेंकटेश यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई काँग्रेसचे एकदिवसीय शिबिर शनिवारी झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची मागणी केली.



भविष्यात काँग्रेसला मजबूत करायचे आहे. काँग्रेस मजबूत व्हावी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा मान राखत हा निर्णय घेतला आहे, असे चेन्निथला म्हणाले.

काही पक्षांची भूमिका ही संकुचित आहे. लोकांना त्रास देण्याची राहिली आहे. पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी त्यांचा घ्यावा. पण सध्या ते ज्या लोकांशी चर्चा करत आहेत त्यावरून त्यांच्याशी आमचे कितपत जमेल हे माहित नाही,” असे काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना (ठाकरे) सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी शनिवारी भेट घेतली. यावेळी मनसे शिवसेना युतीबाबत चर्चा झाल्याचे समजते.

दरम्यान, बिहारमधील एकंदरित झालेला व्हास पाहून काँग्रेसच्या नेत्यांनी बोध घ्यायला हवा. तो हास पाहिल्यानंतरही त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायची असेल तर लढवावी. त्यांना कोणी थांबवू शकत नाही. त्यांचे वरिष्ठ त्यांना थांबवू शकतील, असे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

Will contest Mumbai Municipal Corporation elections on its own, Chennithala clarifies

महत्वाच्या बातम्या