विशेष प्रतिनिधी
सोलापूर : Jaykumar Gore तुम्हाला नवरासुद्धा शंभर रुपये देत नाही. देवाभाऊंनी लाडकी बहीण योजना आणली, पंधराशे रुपये तुम्हाला दिलेत. या पंधराशे रुपयांची इमानदारी ठेवा. देवाभाऊ नसले तर तुमच्या खात्यातील पैसे बंद होतील, असे आवाहन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेJaykumar Gore
कुर्डुवाडीतील प्रचार सभेत जयकुमार गोरे लाडक्या बहिणींना उद्देशून म्हणाले, ‘येत्या २ तारखेला मतदान आहे. पैसा कुणाचा पण घ्या. काही फरक पडत नाही. सगळ्यांचे पैसे घ्या, पण मत त्यांना देऊ नका. मतदानाला जाताना देवाभाऊचे पंधराशे रुपये विसरू नका. इमानदारी ठेवा. तुम्हाला नवरासुद्धा १०० रुपये देत नाही. सख्खा भाऊसुद्धा राखी पौर्णिमेला १०० रुपये टाकताना त्याच्या बायकोकडे पाहतो. तिने मान हलवली तरच तो ताटात टाकतो आणि नाही म्हटले की तो परत नोट खिशात घालतो.Jaykumar Gore
शिंदे गटावर निशाणा साधताना गोरे म्हणाले, इथे येऊन कोण म्हणतय तिजोरी आमच्याकडे आहे, तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत. पण बँकेच आमच्याकडे आहे तर तिजोरी आणि चावी कोठून आणणार? सरकार म्हणजे फक्त मुख्यमंत्री असते. मंत्रिमंडळ ही व्यवस्था असे. राज्यातील प्रत्येक प्रोजेक्ट मुख्यमंत्र्यांच्या सहीने मंजूर होतो.
“Your Husband Does Not Give You Even 100 Rupees, Devendra Bhau Gives 1,500, Stay Loyal”, Says Jaykumar Gore
महत्वाच्या बातम्या
- भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी
- Dilip Walse Patil : माझं राज्यातल वजन थोडं कमी झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली खंत
- ‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका
- Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा काढली खोडी, टी-शर्टवर कुत्र्याचा फोटो आणि ‘RSS’ सारखे दिसणारे अक्षर