बारामती मध्ये अघोरी पूजा, झाडाला टांगलेले बोकड; अमोल मिटकरींची पोस्ट चर्चेत…

विशेष प्रतिनिधी

पुणे: राज्यात सध्या चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समोर आले होते.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना भोंदू अशोक खराच्या संपर्कात असल्याने राजीनामा द्यावा लागला होता,त्यामुळे खरात आणि अजित पवारांच्या यांचा अपघाताचा काही संबंध नाही न ? अशी शंका अमोल मिटकरी यांनी उपस्थित केली आहे.

नोव्हेंबर महिन्यात अजित पवारांच्या बारामती मधील निवास्थानजवळ अघोरी पूजा झाल्याचे त्यांनी सांगितले होते.या संबंधित फोटो देखील त्यांनी एक्झवरून शेअर केले होते. त्यातच अमोल मिटकरी यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, ‘ बारामतीमध्ये सहयोग घर, काटेवाडी घर, विद्या प्रतिष्ठान येथे अघोरी पूजा होतात.हे बाहेरून येणाऱ्यांना शक्य नाही.तर अघोरी विद्या मानणारे त्यांच्याशी जोडले जाणारे राजकीय बलाढ्य व्यक्ती व त्यांचे बारामतीला असलेले हस्तक याशिवाय होऊ शकत नाही,अशातच आता बारामतीमध्ये हा व्हिडिओ प्रसार माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.



अमोल मिटकरी म्हणाले की, ‘ डिसेंबर २०२५ रोजी विद्या प्रतिष्ठान ए.आय इमारत बांधकामाजवळ अघोरी पूजा मध्यरात्री मांडण्यात आली होती.आदरणीय दादा सकाळी इमारत बांधकाम पाहणीसाठी येणार होते’.या प्रकरणामागे मोठ्या राजकीय नेत्यांचा हात असल्याचा संशय देखील अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.

तर मिटकरी यांनी त्यांचा तिसऱ्या ट्वीट मध्ये काटेवाडी परिसरात एक झाडाला बोकड उलटे टांगून खाली अघोरी पूजा करण्यात आल्याचे स्थानिक लोकांनी आपल्याला सांगितल्याचा दावा केला आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर चार महिन्यात ही सर्व आढळून आल्याने,अजित पवारांचा घात झाल्याचा संशय मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.

Aghori Puja in Baramati, goat hanging from a tree; Amol Mitkari’s post is in the news…

 

महत्वाच्या बातम्या