Datta Gade स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी नव्हे तर ग्रामस्थांनी पकडले?

Datta Gade स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी नव्हे तर ग्रामस्थांनी पकडले?

विशेष प्रतिनिधी

पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे Datta Gade याला शिताफीने पकडल्याची दावा पोलिसांनी केला आहे. मात्र गुनाटः येथील ग्रामस्थांनी पोलिसांनी नव्हे तर ग्रामस्थांनी गाडे याला पकडल्याचा दावा केला आहे. काही पोलिसांनी माझ्याकडून आरोपीला हिसकावून नेल्याचे एका ग्रामस्थाने सांगितले.

स्वारगेट पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. तीन दिवसांपासून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध पोलीस घेत होते. मात्र तो पोलिसांना चकवा देत होता. दत्तात्रय गाडे गुनाट गावातच लपला असल्याची खात्री पटल्यानंतर आणि पोलिसांनी या गावात मोठा पोलिस फौजफाटा बोलावला. जणू संपूर्ण गावाला पोलिसांनी वेढा घातला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला आम्ही पकडल्याचा ग्रामस्थांनी दावा केला आहे. ग्रामस्थ गणेश गव्हाणे, साईनाथ वळु यांच्यासह इतर काही ग्रामस्थांनी आरोपीला पकडल्याचे त्यांनी म्हटले आहे. काही पोलिसांनी माझ्याकडून आरोपीला हिसकावून नेल्याचे गव्हाणे यांनी सांगितले. ⁠आरोपीला पकडल्यानंतर त्याची माहीती क्राईम ब्रांचच्या काही पोलीस आणि अधिकाऱ्यांना दिली होती, असेही गव्हाणे यांनी सांगितले.

गव्हाणे म्हणाले, ⁠गुनाट गावातील जीपीएस क्रिकेट ग्राउंड येथील चंदन वस्तीच्या परीसरात आरोपी होता. तेथे त्याला पकडले होते. तत्पूर्वी पुणे पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यासाठी मदतीचे नागरिकांना आवाहन केले होते. आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. अशात आता ग्रामस्थांकडून आम्हीच आरोपी गाडेला पकडले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गाडे गुनाट गावातच लपला असल्याची खात्री पटल्यानंतर या गावात मोठा पोलिस फौजफाटा बोलावला. जणू संपूर्ण गावाला पोलिसांनी वेढा घातला. कारण अंधार पडण्याच्या आता पोलिसांना त्याला पकडायचं होतं. मात्र सायंकाळ झाली तरी आरोपीचा शोध लागत नव्हता. अंधार झाल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन थांबवण्याचे ठरवले. यानंतर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय गाडे गावालगत असणाऱ्या शेतात पोलिसांना काही संशयास्पद हालचाल जाणवली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, असता तो दत्तात्रय गाडे असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतात दत्तात्रय गाडेला Datta Gade शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरु होतं तिथं तो नव्हताच. दत्तात्रय गाडे रात्री नातेवाईक महेश बहीरट यांच्या घरी साडे दहा वाजता आला. त्यानंतर तो आल्याची माहीती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. ⁠ दत्तात्रय गाडेने नातेवाईकांकडुन पाण्याची बाटली घेतली. माझी मोठी चुक झालीय, मला सरेंडर करायचं असं सांगून तिथुन निघुन गेला. त्यानंतर पोलीसांनी या घराच्या परीसरात दत्तात्रय गाडेचा शोध सुरु केला. डॅाग स्कॅाड ही त्याठिकाणी आणले. पोलीसांना त्याचा बदलेला शर्ट सापडला , त्याचा वास डॅाग स्कॅाडला दिला- त्याआधारे डॅाग स्कॅाडने पुढील रस्ता पोलीसांना दाखवला , पण गाडे ज्या ठीकाणावरुन आला होता, तिथे परतलाच नाही. तो नातेवाईकांच्या घराच्या परीसरात असलेल्या चारीमध्ये झोपून राहिला.

Datta Gade, the accused in the Swargate rape case, was caught by the villagers and not by the police?

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023