विशेष प्रतिनिधी
पुणे : Jejuri-Morgaon road पुणे जिल्ह्यातील जेजुरी – मोरगाव रोडवर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघात आठ जण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री सव्वा 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.Jejuri-Morgaon road
सोमनाथ रामचंद्र वायसे, रामु संजीवन यादव (दोघेही रा. नाझरे कप ता. पुरंदर), अजय कुमार चव्हाण (रा. उत्तरप्रदेश) अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), किरण भारत राऊत (रा. पवारवाडी, ता. इंदापूर), अक्षय शंकर राऊत ( रा. झारगडवाडी, ता. इंदापूर) अश्विनी शंकर ऐसार (रा. नागनसूर हेद्रे, सोलापूर) अशी मृतांची नावे असून अन्य एकाची ओळख पटू शकली नाही.
जेजुरीहून मोरगावकडे भरधाव वेगाने जात असलेली स्विफ्ट डिझायर कार (MH 42 AX 1060) ही रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप टेम्पो (MH 12 XM 3694) ला धडकली. हा अपघात श्रीराम ढाब्याजवळील एका कंपनीसमोर घडला. अपघातावेळी टेम्पोमधून सामान उतरवण्याचे काम सुरू होते. ही धडक इतकी जोरात होती की, ही कार टेम्पोच्या बाजूला असणाऱ्या कार ( क्र.एम एच 12 टी के 9483) वर आदळली.
या भीषण अपघातात टेम्पो मधील वस्तू खाली करणारे दोघेजण, श्रीराम ढाब्यासमोर उभे असणारे तिघे तर कार मधील तिघे जण जागेवरच ठार झाले. दोन मुले, एक महिला, दोन पुरुष असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Eight people died on the spot in a horrific accident between a car and a pickup tempo on Jejuri-Morgaon road
महत्वाच्या बातम्या
- IndusInd bank ‘इंडसइंड’ नंतर आता ‘ही’ बलाढ्य बँक RBIच्या रडारावर; कधीही होवू शकते कारवाई!
- Raj Thackeray : गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही, मग महाराष्ट्रात सक्ती का? राज ठाकरे यांचा सवाल
- Dada Bhuse : राज्यात हिंदी नाही मराठीच अनिवार्य, विद्यार्थी पाठीमागे राहू नये यासाठी त्रिभाषा सूत्र, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले स्पष्ट
- Dhule extortion case : धुळे खंडणी प्रकरणाचा तपास योग्य दिशेने करा अन्यथा नाईलाजाने या प्रकरणातील इतर स्फोट, संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे इशारा