IndusInd bank ‘इंडसइंड’ नंतर आता ‘ही’ बलाढ्य बँक RBIच्या रडारावर; कधीही होवू शकते कारवाई!

आता आरबीआय बारकाईने लक्ष ठेवून सखोल चौकशीही करत आहे. IndusInd bank

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) तीक्ष्ण नजर आता आणखी एका मोठ्या बँकेवर आहे. इंडसइंड बँकेनंतर आता परदेशी बँक स्टँडर्ड चार्टर्ड पीएलसी आरबीआयच्या रडारवर आली आहे. या बँकेने किचकट वित्तीय उत्पादनं लघु आणि मध्यम उद्योगांना (एसएमई) विकली, ज्यात मोठे धोके होते परंतु ग्राहकांना त्याबद्दल पूर्ण माहिती देण्यात आली नव्हती. आता आरबीआय या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे आणि कधीही मोठी कारवाई केली जाऊ शकते. IndusInd bank

संपूर्ण प्रकरण काय आहे?

बिझनेस स्टँडर्डच्या अलीकडील अहवालानुसार, स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने काही डेरिव्हेटिव्ह उत्पादने लहान आणि मध्यम व्यवसायिकांना विकली जी त्यांच्यासाठी योग्य नव्हती. यामध्ये विशेषतः टार्गेट रिडेम्पशन फॉरवर्ड्स (टीआरएफ) सारखी किचकट उत्पादने समाविष्ट आहेत. ही उत्पादने सहसा मोठ्या कंपन्यांसाठी डिझाइन केली जातात ज्यांच्याकडे जोखीम घेण्याची क्षमता आणि समज असते, परंतु ही उत्पादने लहान व्यवसायिकांना विकताना, बँकेने जोखमीबद्दल संपूर्ण माहिती देण्यात निष्काळजीपणा दाखवला.

आरबीआयला त्यांच्या चौकशीत असे आढळून आले की या टीआरएफमध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, परंतु बँकेने ग्राहकांना याबद्दल योग्यरित्या सांगितले नाही. यामुळेच आता आरबीआयने स्टँडर्ड चार्टर्डच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. लहान व्यावसायिकांना अशा धोकादायक उत्पादनांची विक्री करणे बँकेसाठी समस्या बनू शकते..

After IndusInd bank now Standard Charted bank is on RBI radar

महत्वाच्या बातम्या