विशेष प्रतिनिधी
पुणे: देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून, पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली ‘नीट यूजी २०२६’ परीक्षा आता येत्या २१ जून २०२६ रोजी पुन्हा घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा National Testing Agency कडून करण्यात आली आहे. देशभरात उघडकीस आलेल्या पेपरफुटी प्रकरणानंतर निर्माण झालेल्या गोंधळ, आंदोलनं आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबतच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर अखेर परीक्षा प्राधिकरणाने पुनर्परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.
सर्व पार्श्वभूमीवर आता NTA ने नवीन वेळापत्रक जाहीर करत २१ जून रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, या पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी NEET UG 2026 साठी अर्ज भरला होता, त्यांची आधीची नोंदणी आणि परीक्षा केंद्र कायम ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नव्याने फॉर्म भरण्याचा किंवा कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा त्रास होणार नाही.
तसेच पुनर्परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याचेही NTA ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि यावेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था, डिजिटल देखरेख आणि केंद्रांवर विशेष नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याची सांगण्यात येत आहे.
दरम्यान, NEET परीक्षा पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने घेण्याबाबत केंद्र सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, या पुनर्परीक्षेकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
New date of NEET UG 2026 exam announced; Exam to be held on June 21
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी