पार्थ पवारांची भेट, टिंगरे पुन्हा चर्चेत; विधान परिषदेतून राजकीय पुनर्वसन होणार?

विशेष प्रतिनिधी

पुणे: शहरातील वडगावशेरी मतदारसंघाचे माजी आमदार अजित पवार गटाचे नेते सुनील टिंगरे यांचे राजकीय पुनर्वसन होणार अशा चर्चा संध्या शहरात रंगल्या आहेत.आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील टिंगरे यांनी खासदार पार्थ पवार यांची भेट घेतली आहे.या भेटीमुळे अजित पवार गटाकडून विधानपरिषदेसाठी कोणाला संधी दिली जाणार,याबाबत पक्षात उत्सुकता वाढली असून,सुनील टिंगरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगीतले जात आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधानपरिषदेवर एका उमेदवाराला संधी दिली जाणार आहे.या एका जागेसाठी पक्षातील अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत.तरी,पुण्यातील राजकारणात संघटनात्मक पकड आणि अजित पवार हयात असताना त्यांच्याशी असलेले जवळीक यामुळे सुनील टिंगरे यांचे पारडे जड मानले जात आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून झालेल्या पराभवानंतर बॅकफूटवर गेलेल्या सुनील टिंगरेंना विधान परिषदेचे सक्रिय राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची मोठी संधी मानली जात आहे.



विशेष म्हणजे, सुनील टिंगरे यांनी यापूर्वी अनेक राजकीय घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर उघडपणे विश्वास दाखवला होता. पक्षातील बदलत्या समीकरणांमध्ये त्यांनी अजित पवार यांच्याशी असलेली राजकीय बांधिलकी कायम ठेवली. त्यामुळे निष्ठा आणि संघटनात्मक दृष्ट्या प्रभावी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून, त्यांना विधान परिषदेवर संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे.

सुनील टिंगरे यांच्या वाढलेल्या हालचाली, पार्थ पवार आणि पक्षातील इतर जेष्ठ नेत्यांशी झालेल्या भेटीगाठी त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार का?याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Parth Pawar’s meeting, Tingre in the news again; Will there be political rehabilitation from the Legislative Council?

महत्वाच्या बातम्या