Sanjay Raut गृह राज्यमंत्री दिव्यच, बलात्कार घटनेवर संशयामुळे संजय राऊतांचा योगेश कदम यांच्यावर हल्लाबोल

Sanjay Raut गृह राज्यमंत्री दिव्यच, बलात्कार घटनेवर संशयामुळे संजय राऊतांचा योगेश कदम यांच्यावर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सर्व घटना शांततेत घडल्यामुळे बाहेर काही कळलं नाही. गृहराज्यमंत्र्यांची ही अशी भूमिका? एका मुलीवर बलात्काराची घटना घडते आणि गृहराज्यमंत्री म्हणतात की तिने फोर्सफुली किंवा स्ट्रगल केलं नाही. अशा पद्धतीचा शब्द त्यांनी वापरला. खरं म्हणजे आपले गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut)  गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्यावर टीका केली.

स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार घटनेबाबत बोलताना कदम यांनी केलेल्या एका विधानावरून संजय राऊत म्हणाले, पुणे पोलिसांनी आणि सरकारने आरोपीला अटक केलं म्हणजे फार उपकार केले नाहीत. स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडते आणि त्या घटनेवर बोलताना गृहराज्यमंत्री काय बोलतात?

स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये जी घटना घडली, ती घटना कुठलीही फोर्सफुली किंवा स्ट्रगल न झाल्यामुळे घडली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी जवळ आसपास दहा ते पंधरा लोकं आजू बाजूला उपस्थित होते. पण कोणालाही शंका आली नाही, असे योगेश कदम यांनी म्हटले होते.

उपमुख्यमंत्र्यांवर टीका करताना राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे फार मोठे साहित्यिक, फार मोठे लेखक, फार मोठे कवी, फार मोठे संत आहेत. यापेक्षा अजून काही पदवी द्यायची असेल तर देऊ. एकनाथ शिंदे अशा पदव्या विकत घेऊ शकतात. आमदार आणि खासदार जसे विकत घेतले जातात त्या प्रकारे साहित्यिक, लेखक, कवी या पदव्या जर एकनाथ शिंदेंना हव्या असतील तर ते त्या पदव्या विकत घेऊ शकतात. एकनाथ शिंदे यांना अमित शहा अजून पुरस्कार देऊ शकतात. एवढंच नाही तर ते एकनाथ शिंदेंना ज्ञानपीठ पुरस्कार देखील देऊ शकतात.

Sanjay Raut attacked Yogesh Kadan who said the rape was carried out peacefully

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023