विशेष प्रतिनिधी
पुणे: Santosh Mane शहरात आज संध्याकाळी एका माथेफिरूने PMPML बस चोरून पळवल्याची धक्कादायक घटना घडली. या माथेफिरूने दारू व इतर अमली पदार्थांचे सेवन केल्याची प्राथमिक दृष्ट्या दिसून आले. त्याने बस संपूर्ण शहराच्या मध्यवर्ती मुख्य रस्त्यावरून घालण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने, पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली असून, डेक्कन पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.Santosh Mane
नेमकी घटना काय?
आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास डेक्कन बस स्थानकावरून MH 12 YB 5086 क्रमांकाची PMPML बस एका अज्ञात तरुणाने चोरली. बस ताब्यात घेतल्यानंतर हा तरुण बेशिस्तपणे आणि चुकीच्या दिशेने बस चालवत होता. त्याने ही बस थेट गजबजलेल्या गुडलक चौकापर्यंत आणली.Santosh Mane
पोलिसांची तत्परता आणि थरार
गुडलक चौकात ही बस वळवताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने बस थेट डिव्हायडरवर चढवली. तिथून पळ काढण्याच्या प्रयत्नात असतानाच परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात हा संशयास्पद प्रकार आला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता बसचा पाठलाग केला आणि सिग्नलजवळ बस अडवून चालकाला ताब्यात घेतले.
मोठी दुर्घटना टळली
काही वर्षांपूर्वी पुण्यात घडलेल्या संतोष माने प्रकरणाच्या आठवणी या घटनेने ताज्या झाल्या. तो माथेफिरू चालकही अशाच प्रकारे बस घेऊन सुटला होता. मात्र, आज पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही.
पुढील तपास सुरू
ताब्यात घेतलेल्या आरोपीला डेक्कन पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. त्याने ही बस नेमकी कशासाठी चोरली आणि त्याचा हेतू काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत. चोरीला गेलेली बस सुरक्षितपणे पुन्हा डेक्कन डेपोमध्ये जमा करण्यात आली आहे.
भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे पुणेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
“Santosh Mane incident nearly repeated in Pune! Brave police catch stolen PMPML bus in filmy style!”
महत्वाच्या बातम्या
- पुण्याच्या सौंदर्याचा ‘बळी’ देऊन मलिदा लाटण्याचा डाव; १५ वर्षांत कोट्यवधींच्या उलाढालीचे नियोजन!
- नाशिक पाठोपाठ मुंबईत कॉर्पोरेट जिहाद, तरुणीचा अश्लील मेसेजद्वारे छळ
- भाजपाची ३० उमेदवारांची यादी तयार! दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; “या”नावांचा समावेश..
- janaakrosh rally : जनआक्रोश रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल