विशेष प्रतिनिधी
पुणे : नेत्यासाठी काहीही करणे कार्यकर्त्यांना कसे भोवते याचे उदाहरण मुळशी तालुक्यात समोर आले आहे. भोर – वेल्हा – मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांची हत्तीवरून काढण्यात आलेली मिरवणूक कार्यकर्त्यांना भोवली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वन विभागाने मांडेकर यांच्या मिरवणुकीचे संयोजक आणि हत्ती देणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा केला दाखल
मांडेकर यांची भोर विधानसभा मतदार संघातून आमदार पदी निवड झाल्याबद्दल, उरवडे गावाच्या ग्रामस्थांकडून त्यांची फुलांची उधळण करून हत्तीवरून जंगी मिरवणूक काढून 125 किलो पेढ्यांचं वाटप करत भव्य नागरी सत्कार करण्यात आलं..
याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल झाल्यानंतर, पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आदित्य परांजपे यांनी याबाबत अधिक माहिती घेतली..तेंव्हा वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आले.. सर्व नियम धाब्यावर बसवून हत्तीवरून मिरवणूक काढल्याबद्दल, संयोजक आणि संबंधित संस्थेवर वनाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखलं करत कारवाई करण्यात आली.
शंकर मांडेकरांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री पिरंगुट येथे मांडेकर यांची हत्तीवर मिरवणूक काढली होती. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आदित्य परांजपे यांनी अधिक माहिती घेतली. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
आमदार शंकर मांडेकर यांच्या मिरवणूकीत हत्ती पाठवण्याच्या सरकारच्या सर्व परवानग्या संस्थानने घेतल्या होत्या. आमच्याकडून कोणताही कायदा मोडण्यात आलेला नाही, तासगावच्या श्री गणपती पंचायतन संस्थांनचे अध्यक्ष राजेंद्र पटवर्धन यांनी सांगितले.
Shankar Mandekar on an elephant cost the activists, a case was registered
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन