first Pasture Safari पुणे जिल्ह्यात सुरू झाली पहिली कुरण सफारी, चिंकारा, लांडगे, तरस, कोल्हे पाहता येणार

विशेष प्रतिनिधी

पुणे: गवताळ प्रदेशामध्ये जिप्सीमधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचे उद्घाटन कडबनवाडी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले. या सफरीतून चिंकारा, लांडगे, तरस, कोल्हे पाहता येणार आहेत.

राज्यातील हा पहिलाच गवत कुरण सफारीचा प्रयोग राबविला आहे, त्यामुळे कडबनवाडीचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणार आहे. या ठिकाणी वनविभाग पर्यटकांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. येथे गवत कुरण सफारी सुरू केल्यापासून येथील चिंकारा, लांडगे, तरस, कोल्हे यांसह गवतावरचे पक्षी पाहता येणार आहेत.

यावेळी भरणे यांच्या हस्ते पुणे वनविभागाकडून एकूण ३ जिप्सीधारकांना प्रत्येकी १ लाख रुपयाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले तसेच कडबनवाडी गवताळ प्रदेशाच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले.



भरणे यांनी कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशाची स्वतः सफारी केली. नागरिकांनीही या सफारीचा आनंद घेऊन याबाबत इतर नागरिकांपर्यंत माहिती पोहचवावी, असे आवाहन केले.

यावेळी कडबनवाडी वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जलभूषण भजनदास पवार, सदस्य दादासाहेब जाधव, सरपंच संगिता गावडे, उपसरपंच कडबनवाडी, अॅड. सचिन राउत, फ्रेंडस ऑफ नेचर क्लब, निमगाव केतकी व त्यांचे सदस्य आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

The first Pasture Safari has started in Pune district, you can see chinkara, wolves, deer, foxes

महत्वाच्या बातम्या