Hindi compulsion in Pune : पुण्यात हिंदी सक्तीविरोधात बॅनरबाजी; ‘मराठी अस्तित्वाच्या लढ्यासाठी एकत्र या’ असा मराठी जनतेला साद

विशेष प्रतिनिधी

पुणे : राज्यात हिंदी सक्तीविरोधात असंतोषाचा सूर अधिकच तीव्र होऊ लागला आहे. पुण्यातील पाषाण, सुसरोड आणि बाणेर परिसरात ‘मराठी माणसाच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी एकत्र या’ अशा आशयाचे बॅनर लावून हिंदी सक्तीला विरोध करण्यात आला आहे.  Hindi compulsion in Pune

या बॅनरमध्ये लिहिले आहे की “महाराष्ट्रात १ ली ते ५ वीपर्यंत हिंदी सक्ती नको… महाराष्ट्रात फक्त मराठी!ही केवळ भाषेची नव्हे, तर मराठी अस्मितेची, संस्कृतीची आणि अस्तित्वाची लढाई आहे.”

बॅनरच्या माध्यमातून मराठी जनतेला साद घालण्यात आली आहे. “प्रिय मराठी बंधू-भगिनींनोभारताला भूगोल आहे, पण माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे, असेया बॅनरमध्ये म्हटले आहे की, राज्यात सरकारे येतील-जातील, पक्ष फुटतील आणि पुन्हा एकत्र येतील, युती-आघाड्या होतील आणि तुटतील, पण मराठी भाषा आणि संस्कृतीवर कोणताही हल्ला सहन केला जाणार नाही.

मराठीवर होणाऱ्या दबावाला ही “मराठी अस्मितेवरचा थेट हल्ला” असे संबोधून, एकजूट होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “महाराष्ट्रात मराठीच हवी” हा संदेश देत, “म-महाराष्ट्राचा, म-मराठीचा” अशी जाज्वल्य घोषणा बॅनरमध्ये झळकते.

या बॅनरमागे कोणती संस्था किंवा संघटना आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की, हे बॅनर “सरकारी धोरणांविरोधातील लोकभावनेचा आवाज असून, लवकरच या विरोधाला संघटित स्वरूप देण्याचा विचार सुरू आहे.

राज्यात नुकतेच शालेय शिक्षण विभागाने त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले होते. या धोरणांतर्गत पहिलीपासून हिंदी शिकवण्याची सक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यावरून अनेक मराठीप्रेमी संघटना, साहित्यिक, राजकीय नेते आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आगामी काळात विरोधी पक्षांसह विविध मराठी संघटनांकडून एकत्रित मोर्चाचे आयोजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Hindi compulsion in Pune

Banners against Hindi compulsion in Pune; Appeal to Marathi people to ‘come together for the fight for Marathi existence’

महत्वाच्या बातम्या