सुप्रिया सुळेंची फेसबुक पोस्ट चर्चेत; उद्धव ठाकरेंना केली “ही” विनंती…

विशेष प्रतिनिधी

पुणे: राज्यात सध्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत.राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली पाहायला मिळत आहेत. भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस दोन्ही गटांमध्ये उमेदवारांची चाचपणी सध्या सुरू आहे.

विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता,भारतीय जनता पक्षाचे पारडे जड मानले जात आहे. भाजपाच्या खात्यात ६ जागा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तर शिवसेनेला २,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला २ आणि महाविकास आघाडीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येकी उमेदवाराला विजयासाठी 28 मतांची गरज आहे. महायुतीकडे असलेले स्पष्ट बहुमत लक्षात घेता त्यांचे आठ उमेदवार विजयी होऊ शकतात.



संभाव्य उमेदवार कोण?

विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांची नावे पुढे येत आहेत.माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते आणि संजय काका पाटील यांच्यासह संजय केणेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी या नावांची जोरदार चर्चा आहे.तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंचे शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत देखील अनेक नावांची चर्चा ऐकायला मिळत आहे.

सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत..

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा खासदार सुप्रिया सुळे यांची पोस्ट आता सध्या चर्चेत आली आहे. सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना विधान परिषद निवडणूक लढवण्याची विनंती केली आहे.सुप्रिया सुळे पोस्ट मध्ये म्हणाल्यात की, ‘ विधान परिषदेचे निवडणूक उद्धव ठाकरे यांनी लढवावी अशी राष्ट्रवादी शरद पवार गटाची विनंती आहे.उद्धवजी हे राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांचा अनुभवाचा राज्याला आणि सभागृहाला नेहमीच फायदा होत राहील,असा आम्हा सर्वांना विश्वास आहे.उद्धव ठाकरे यांनी विनंतीचा विचार करावा अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे ‘.

सुप्रिया सुळे यांच्या या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Supriya Sule’s Facebook post is in the news; She made “this” request to Uddhav Thackeray…

महत्वाच्या बातम्या