Warje Salon! Bullet : 2023 च्या जुन्या वादातून हल्ला? वारजे घटनेत धक्कादायक खुलासा

2023 च्या जुन्या वादातून हल्ला? वारजे घटनेत धक्कादायक खुलासा


विशेष प्रतिनिधी

पुणे : Warje Salon! Bullet पुण्यातील वारजे परिसरात आज सायंकाळी एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. चैतन्य चौकातील एका सलूनमध्ये अचानक गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. साधारण संध्याकाळी 6:40 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे सलूनमध्ये उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. Warje Salon! Bullet

सलूनमध्ये झटापटीत केला गोळीबार..

मिळालेल्या माहितीनुसार, निहाल शिंदे हे सलूनमध्ये केस कापत असताना काही आरोपी तिथे दाखल झाले आणि अचानक वादातून झटापट सुरू झाली. या झटापटीदरम्यान गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात केस कापण्यासाठी बसलेला निहाल शिंदे याच्या डाव्या कानाला गोळी लागून गंभीर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर सलूनमध्ये उपस्थित असलेला अमोल आढाव हाही या गोंधळात जखमी झाला आहे. Warje Salon! Bullet



१ आरोपी ताब्यात, ४ जण फरार…

घटनेनंतर परिसरात तात्काळ गोंधळ उडाला, नागरिकांनी आरडाओरडा करत सुरक्षिततेसाठी पळ काढला. मात्र, या दरम्यान पोलीस दलाच्या डीबी पथकाने जलद हालचाल करत कारवाई केली. गस्तीदरम्यान घटनास्थळीच साहिल राऊत या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात एकूण पाच आरोपींची ओळख पटली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

पूर्व वैमनस्यातून गोळीबार केल्याचे स्पष्ट..

प्राथमिक तपासात ही घटना जुन्या वैमनस्यातून घडल्याचे स्पष्ट झाले आहे. निहाल शिंदे आणि आरोपी यांच्यात जानेवारी 2023 मध्ये घडलेल्या एका गुन्ह्याशी संबंधित वाद असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच जुन्या वादाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील तपास वारजे पोलिसांकडून सुरू आहे. तपासात अधिक बाबी काय समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Thrilling Shootout in Warje Salon! Bullet Hits Youth’s Ear During Haircut, Two Injured; Attack Due to Old Enmity

महत्वाच्या बातम्या