विशेष प्रतिनिधी
पुणे : double-decker buses ‘स्विच’ या मोबिलिटी कंपनीच्या मंजुरीनंतर पुणे शहर नवीन डबल-डेक्कर बस सुरू करण्यास सज्ज झाले आहे. या बसची चाचणी एका आठवड्यासाठी मगरपट्टा, हिंजवडी आणि खराडी सारख्या मुख्य भागात घेतली जाईल, जर या चाचण्या यशस्वी झाल्या तर पीएमपीएमएल प्रशासन शहरात, विशेषतः आयटी पार्क परिसरात डबल-डेक्कर बस सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात येईल. double-decker buses
मुंबईतील बस सेवेचे अनुकरण करत पीएमपीएमएल प्रशासन देखील पुण्यात डबल-डेक्कर बसेस आणण्याची सक्रिय योजना आखत आहे. ‘स्विच मोबिलिटी’च्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच पीएमपीएमएलच्या प्रतिनिधींशी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेतली आणि कंपनीने शहरासाठी बसेस पुरवण्याची सहमती दर्शविली आहे.
काय आहेत या नवीन बसची वैशिष्ट्य ?
ही नवीन डबल-डेक्कर बस इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित आहे. या बसमध्ये डिजिटल तिकीट आणि सुरळीत प्रवासासाठी सुधारित सस्पेंशन सारख्या आधुनिक सुविधा असतील. या बसचा लुक हा लंडन शैलीशी बऱ्यापैकी मिळता-जुळता असणार आहे. या बसमध्ये एकाच वेळी ७० प्रवासी बसून तर ४० प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात. या बसची ऊंची १४ फूट ४ इंच इतकी असली तरीदेखील ही बस मेट्रो स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यत्यय आणणार नाही. double-decker buses
ही बस पुण्यात पूर्वी वापरल्या जाणाऱ्या जुन्या ‘एसएलएफ’ डबल-डेकर बसेसपेक्षा अधिक फायदेशीर व अधिक उत्पन्न असण्याची अपेक्षा आहे. जुन्या बसचा देखभालीचा खर्च जास्त होता. मात्र, नवीन इर्लेक्ट्रिक बस प्रवाजांना आरामदायी अनुभव प्रदान करण्यासोबतच देखभालीचा खर्च देखील कमी करेल.
ही बस पुण्यात आल्यानंतर, ट्रायल रनद्वारे शहरातील विविध मार्गावर तिची कामगिरी आणि प्रवासी सेवा तपासली जाईल. “या चाचण्यांदरम्यान काही समस्या आहेत का ते आम्ही तपासू आणि जर सर्व काही सुरळीत असेल तर लवकरच पीएमपीएमएलच्या ताफ्यात डबल-डेकर बसेस धावतील,” असे पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे म्हणाले. double-decker buses
Will double-decker buses now run in Pune too?
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा