MSP आता शेतकऱ्यांना ५० टक्के अधिक एमएसपी मंजूर

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिली

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आता मोदी सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी शेतकऱ्यांबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ज्यात खरीप पिकांसाठी ५० टक्के अधिक एमएसपी मंजूर करण्यात आला आहे. देशाच्या केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः पत्रकार घेत माध्यमांसमोर ही माहिती दिली.

यावेळी बोलत असताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार समितीने २०२५-२६ साठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती वाढवण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला आहे.



यामधून उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर भाव मिळावा हा केंद्र सरकारचा उद्देश आहे. यावर्षी एमएसपीमध्ये झालेली ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत फार जास्त प्रमाणात आहे. यात विशेष म्हणजे नायजर बियाण्यांसाठी सर्वात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर रागी या पिकासाठी दुसऱ्या स्थानावर वाढ करण्यात आली असून यामध्ये कापूस आणि तीळ तिसऱ्या स्थानावर आहेत.

या एमएसपीच्या निर्णयाबरोबरच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत इतरही अनेक निर्णय घेण्यात आले. ज्यात प्रामुख्याने देशातील महामार्गांचा विकास, आंध्र प्रदेशातील कृष्णपट्टणम बंदरापर्यंत जाण्यासाठी ४ पदरी महामार्गाला मान्यता, बडवेल ते नेल्लोरपर्यंच्या महामार्गाचे बांधकाम. तारलाम ते नागदा या मार्गावरील रेल्वेसाठी ५ पदरी मार्गांना मान्यता आणि मुंबई ते दिल्ली कॉरिडॉरची क्षमता वाढवण्याबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत.

Modi governments big gift to farmers 50 percent more MSP approved

महत्वाच्या बातम्या