Parinay Phuke : परिणय फुके यांच्या भावजयीचे आराेप, अंधारे, खडसे यांनी भेट घेऊन दिली हवा

विशेष प्रतिनिधी

पुणे : Parinay Phuke भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांच्या भावजयी प्रिया फुके यांनी फुके कुटुंबावर विविध आराेप केले आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी प्रिया फुके यांची नागपूरमध्ये भेट घेऊन या आराेपांना हवा देण्याचा प्रयत्न केला.Parinay Phuke

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी प्रिया फुके यांची नागपूरमध्ये भेट घेतली. त्यानंतर प्रिया फुके यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळा घटनाक्रम सांगितला. आमदार परिणय फुके यांचे दिवंगत भाऊ संकेत फुके यांचे प्रिया फुके यांच्यासोबत लग्न झाले होते. त्यांचे आजारामुळे निधन झाले. त्यानंतर हा वाद सुरू झाला. प्रिया फुके यांनी सांगितले की, ‘संकेत फुके यांच्यासोबत माझे २०१२ मध्ये लग्न झाले. त्यानंतर काही वर्षांनी संकेत यांना किडनीचा आजार असल्याचे समजले. लग्नाच्या वेळी त्यांना हा आजार असल्याचे माझ्यापासून लपवले गेले होते. दोन वर्षांनी त्यांची किडनी बदलण्यात आली होती.

२०२२ मध्ये संकेत यांचे निधन झाले. त्यामुळे मी माझ्या पतीच्या पैशांच्या व्यवहाराबद्दल आणि मालमत्तेबद्दल घरात विचारणा केली. तेव्हा तू कोण आहे, असे म्हणत १० वाजता घरातून बाहेर काढले गेले. तू काही बोललीस तर तुझ्या कुटुंबाला मारून टाकू असे मला परिणय फुके यांच्याकडून धमकावण्यात आले. मला दोन लहान मुलं आहेत. मुलांसाठी पतीच्या संपत्तीतून हक्काचा हिस्सा मागितल्यानंतर त्रास देणं सुरू झाले. माझ्यावर अॅट्रोसिटीसारखे खोटे गुन्हे मागील दीड वर्षांपासून दाखल केले जात आहेत. मला पोलीस ठाण्यात बोलवलं जात आहे. दोन लहान मुलांसह तासन् तास बसवून ठेवलं जात आहे. हे अमानवीय आहे’, असे प्रिया फुके म्हणाल्या.

या प्रकरणावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘पोलिसांची भूमिका प्रिया फुके यांच्याविरोधात राहिली आहे. त्यांना आरोपाचे पुरावे सादर करा म्हणून पोलीस समन्स पाठवतात, त्यामुळे आम्ही हे पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले आहेत. प्रिया फुके यांच्या विनयभंगाची तक्रार घेतली नाही. आरोपीच्या तक्रारीवरून मात्र अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. प्रिया फुके या लढाईत एकटी पडली होती. त्यामुळे आम्ही तिच्यासोबत उभे आहोत.

आपल्याकडे हिंदू विवाह कायद्यानुसार संपत्तीवर अधिकार असतो. संकेत फुके यांचा मृत्यू आजाराने झाला आहे. त्यामुळे सुनेने संपत्ती मागणे स्वाभाविक आहे. महिला आयोग पक्षाच्या कामात व्यस्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की चौकशीच्या नावावर होणारा त्रास थांबवावा’, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Parinay Phuke’s sister -in-law’s accusations, Andhare, Khadse have met

महत्वाच्या बातम्या