Chief Engineer Throws Currency : छापा पडल्यावर मुख्य अभियंत्याने खिडकीतून फेकल्या नोटा, २.१ कोटींची बेहिशोबी रोकड जप्त

विशेष प्रतिनिधी

भुवनेश्वर : ओडिशा राज्याच्या ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता बैकुंठनाथ सारंगी यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या संशयावरून व्हिजिलन्स विभागाने एकाचवेळी सात ठिकाणी धाडसत्र राबवत तब्बल २.१ कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त केली आहे. छाप्यादरम्यान सारंगी यांनी भुवनेश्वरमधील आपल्या फ्लॅटच्या खिडकीतून नोटा खाली फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. Chief Engineer Throws Currency

व्हिजिलन्स विभागाने मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर हा छापा टाकण्यात आला. बैकुंठनाथ सारंगी यांच्याकडे त्यांच्या अधिकृत उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता असल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. विशेष न्यायाधीश, अंगुल यांनी यासाठी शोध वॉरंट जारी केला होता.

या कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकात ८ उपअधीक्षक, १२ निरीक्षक आणि ६ सहाय्यक उपनिरीक्षक सहभागी होते. धाडीत कराडगडिया (अंगुल), डुमडुमा (भुवनेश्वर), सिउला (पिपीली, पुरी) यांसारख्या ठिकाणांवरील फ्लॅट्स, घरे आणि अन्य ठिकाणांचा समावेश होता.

या ठिकाणी करन्सी काउंटिंग मशिन लावून रोकड मोजण्यात आली. संबंधित रक्कम ही पूर्णपणे बेहिशोबी असून तिचा उगम काय आहे, याचा तपास सुरु आहे.

..व्हिजिलन्स विभागाने जाहीर केले आहे की तपास अजूनही सुरू आहे, आणि सारंगी यांची एकूण संपत्ती, जमिनी, घरे, बँक खाते यावर आधारित पूर्ण आर्थिक तपास सुरू करण्यात आला आहे. या तपासात त्यांच्याकडे अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचे संकेत मिळाले आहेत.
व्हिजिलन्स विभागाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की,”विश्‍वासार्ह माहितीच्या आधारे आमची कारवाई सुरू आहे. या प्रकरणातील सर्व मालमत्तांचा तपशीलवार लेखाजोखा घेतला जात आहे. लवकरच संपूर्ण अहवाल सादर केला जाईल.” Chief Engineer Throws Currency

Chief engineer throws currency notes out of window during raid, unaccounted cash worth Rs 2.1 crore seized