Salman Khurshid : काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधींना दाखवला आरसा युद्धबंदीच्या आरोपांना म्हटले बकवास

विशेष प्रतिनिधी

Delhi News: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीबद्दल काँग्रेस नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांनी परखड मत व्यक्त केले आहे. युद्धबंदीबद्दल सरकारला प्रश्न विचारणाऱ्या सर्वांनाच खुर्शीद यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे खुर्शीद यांनी त्यांच्या काँग्रेस पक्षाचे पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनाही आरसा दाखवला आहे. खुर्शीद म्हणाले म्हणाले की, या संघर्षात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. म्हणूनच त्यांनी आम्हाला युद्धबंदीची ऑफर दिली. सलमान खुर्शीद यांनी युद्धबंदीशी संबंधित सर्व दावे बकवास म्हटले आहेत.

सलमान खुर्शीद म्हणाले की भारताने पाकिस्तानशी संपर्क साधला नाही. ऑपरेशन सिंदूरमुळे दोन्ही देशांमधील तणावामुळे पाकिस्तानच्या डीजीएमओने आमच्याशी संपर्क साधला.

खुर्शीद म्हणाले की तुमच्यापैकी एकाने मला विचारले की आम्ही युद्धबंदी का केली. तर हे म्हणणे पूर्णपणे बकवास आहे. आम्ही आधी पाकिस्तानला बोलावले नव्हते, आम्ही पाकिस्तानला फोन केल का? फोन कोणी घेतला? हे अगदी स्पष्ट आहे की पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओला फोन केला आहे. त्यांनी आम्हाला युद्ध थांबवण्यास सांगितले आणि आम्ही तसे केले. त्यानंतर, आम्ही आणखी कोणतेही हल्ले केले नाहीत.

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी युद्धबंदीच्या मुद्द्यावरून सरकारविरुद्ध आक्रमक भूमिकेत आहेत. राहुल गांधी यांचा आरोप आहे की सरकार अमेरिकेच्या दबावापुढे झुकले आहे. म्हणूनच सरकारने ऑपरेशन सिंदूरमध्येच थांबवले आणि युद्धबंदी सारखी तडजोड केली.

Congress leader Salman Khurshid gave a shock to Rahul Gandhi by expressing his clear opinion on ceasefire

महत्वाच्या बातम्या