Pakistani troll : पाकिस्तानी ट्रोलला प्रत्युत्तर दिल्याबद्दल हिंदू विद्यार्थिनीला अटक: कोलकाता पोलिसांच्या हिंदू विरोधी भूमिकेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: Pakistani troll  तब्बल १५०० किमीचा प्रवास करून कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून २२ वर्षांची कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा हिला अटक केली. पाकिस्तानविरोधातील तिच्या व्हिडिओवरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत तिला अटक करण्यात आली. ही घटना सोशल मीडियावरून सुरू झालेल्या ‘सर तन से जुदा’ प्रकारातील धमक्यांनंतर घडली असून, शर्मिष्ठाने माफी मागून व्हिडिओदेखील हटवला होता.Pakistani troll

ममता बॅनर्जी सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी शर्मिष्ठा हिला अटक करत तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. शर्मिष्ठाने पाकिस्तानविरोधात रोष व्यक्त केला. देशभरात पहलगाम घटनेमुळे संतापाची लाट उसळलेली असताना तिने काही उग्र शब्दांचा वापर केला होता. परंतु ममता सरकारसाठी ही प्रतिक्रिया गुन्हा ठरली. सोशल मीडियावरच्या पाकिस्तान समर्थकांच्या भावना दुखावल्यामुळेच कायदेशीर कारवाई केल्याचं सांगण्यात येतं.

शर्मिष्ठावर झालेली कारवाई तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे. मात्र तरीही तथाकथित मानवी हक्क आंदोलकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. यामुळे संताप व्यक्त होत आहे.

पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत. मात्र त्यावर ममता बॅनर्जी सरकारने कारवाई केली नाही. मात्र केवळ एका पोस्टवरून विद्यार्थिनीला अटक करण्यात आली.

Hindu student arrested for responding to Pakistani troll: Kolkata Police’s anti-Hindu stance confirmed once again

महत्वाच्या बातम्या