Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या सहा नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत

विशेष प्रतिनिधी

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सहा नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत वितरित करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. Pahalgam Attack

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या राज्यातील नागरिकांच्या कुटुंबियांना सुरवातीस 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, नंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मदत रक्कम वाढवून प्रत्येकी 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार मदत व पुनर्वसन विभागाने मृतांच्या कुटुंबियांना ही आर्थिक मदत वितरित केली.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून मिळालेली ही मदत ही अशा कठीण काळात कुटुंबीयांना थोडा आधार देणारी आहे, अशी भावनाही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील पुणे, पनवेल आणि डोबिंवलीतील पर्यटकांना या हल्ल्यात आपले प्राण गमावावे लागले आहेत. डोंबिवलीमधील तिघांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे. पुण्यातील दोघांनी या हल्ल्यात प्राण गमावले असून पनवेलमधील एका पर्यटकाचा गोळीबारामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी या तीन डोंबिवलीकरांचा बळी गेला होता. पुण्यातील कौस्तुभ गणवते, संतोष जगदाळे आणि पनवेलच्या दिलीप डिसले यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता. Pahalgam Attack

Financial assistance of Rs 50 lakhs each to the families of six civilians killed in Pahalgam attack

महत्वाच्या बातम्या