Amit Shah : पश्चिम बंगालातील हिंदूंवरील हिंसाचार आणि घुसखोरीबाबत साधूंनी अमित शहांची घेतली भेट

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : गेल्या काही काळात पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना आणि बांगलादेशमधून होणारी घुसखोरी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी साधूंनी थेट संवाद साधला. त्यांच्या कोलकाता दौऱ्यात स्वामी विवेकानंद यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानी विविध धार्मिक संस्थांचे साधू एकत्र आले आणि त्यांनी आपली चिंता मांडली.

मालदा आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यांतील हिंसाचाराच्या घटना आणि घुसखोरीमुळे हिंदूंवर वाढता धोका याचा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. या भागांतील ताज्या घटनांचा संदर्भ देत साधूंनी हिंदू समाजावर होत असलेल्या कथित अत्याचारांबद्दल गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले.

“आम्ही बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीमुळे निर्माण झालेली स्थिती आणि हिंदूंवरील अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. मात्र, अमित शहा यांनी कोणत्याही विशिष्ट घटनेवर थेट उत्तर दिले नाही,” असे बैठकीत सहभागी असलेल्या एका साधूने सांगितले.

इंटरनॅशनल वेदांत सोसायटीच्या सहसचिव तेजमयी माँ यांनी सांगितले की, “ही केवळ तक्रारींची बैठक नव्हती, तर एकात्मिक प्रयत्नांची गरज व्यक्त करण्यासाठीची बैठक होती. देशासाठी, जनतेसाठी, आणि विशेषतः अध्यात्म जीवनशैलीमधून सामान्यांचे कल्याण कसे साधता येईल यावर भर दिला गेला. सामूहिक कार्याच्या दिशेने पावले टाकणे. सर्व साधूंनी एकत्र येऊन कार्य करण्याची भावना व्यक्त केली. भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी धर्मगुरूंनी सरकारच्या भूमिकेची आठवण करून दिली.

अमित शहा यांनी यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करून भारताच्या अध्यात्मिक परंपरेबद्दल गौरवोद्गार काढले. Amit Shah

Sadhus meet Amit Shah regarding violence and infiltration against Hindus in West Bengal

महत्वाच्या बातम्या