Elon Musk’s father एलन मस्क यांचे वडील एरॉल मस्क यांचे भारतप्रेम! जगातील सर्वोत्कृष्ट नेता म्हणून पंतप्रधान मोदींचे केले कौतुक

Elon Musk’s father एलन मस्क यांचे वडील एरॉल मस्क यांचे भारतप्रेम! जगातील सर्वोत्कृष्ट नेता म्हणून पंतप्रधान मोदींचे केले कौतुक

Elon Musk's father

विशेष प्रतिनिधी

मुंबई : टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलन मस्क यांचे वडील अभियंता एरॉल मस्क सध्या भारत दौऱ्यावर असून त्यांनी भारताच्या प्रगती, अध्यात्मिक परंपरा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले आहे. “मोदी हे सध्या जगातील सर्वोत्तम नेत्यांपैकी एक आहेत,” असे म्हणत त्यांनी मोदींना ‘फँटास्टिक लीडर’ संबोधले.

एरॉल मस्क सध्या सर्वोटेक पॉवर सिस्टीम्स या ग्रीन एनर्जी क्षेत्रातील भारतीय कंपनीचे ग्लोबल अ‍ॅडव्हायझर म्हणून भारतात आले आहेत. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, भारत सध्या ‘विश्वगुरू’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि हे सर्व मोदींमुळे शक्य झाले आहे. भारत आता जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे तो आपोआपच एक जागतिक महासत्ता ठरतो. भारताला आपल्या प्रगतीचा गर्व नाही. भारत इतर अनेक देशांप्रमाणे आत्मप्रशंसा करत नाही. हे खूपच महत्त्वाचं आहे.



काश्मीरमधील दहशतवादावर परखड मत व्यक्त करताना ते म्हणाले, लोकांना अशा परिस्थितीत जगू द्यायला नको. जर पाकिस्तानच या सगळ्या त्रासाचे कारण असेल, तर काहीतरी ठोस उपाययोजना आवश्यक आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.

भारत सरकारच्या नव्या इलेक्ट्रिक व्हेईकल्स आयात धोरणाचे त्यांनी जोरदार समर्थन केले आहे. सरकारने १५% सवलतीने ८,००० इलेक्ट्रिक कार्स आयात करण्यास परवानगी दिली आहे, मात्र त्यासाठी ₹४,१५० कोटींची गुंतवणूक भारतात करावी लागणार आहे. ही खूपच चांगली योजना आहे. यामुळे ईव्ही क्षेत्राला चालना मिळेल आणि संपूर्ण जगासाठी पर्यावरणपूरक भविष्य घडेल,” असे एरॉल मस्क म्हणाले.

Elon Musk’s father Errol Musk loves India! He praised Prime Minister Modi as the best leader in the world.

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023