Gopichand Padalkar : शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना विधान केल्याच्या खटल्यात पडळकर निर्दाेष

विशेष प्रतिनिधी

बारामती :Gopichand Padalkar   शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना, हे वादग्रस्त विधान केल्याच्या खटल्यातून भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गाेपीचंद पडळकर यांची निर्दाेष मुक्ता करण्यात आली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी २०२० मध्ये हे विधान केले होते. याप्रकरणी राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात खटला सुरू होता. या प्रकरणातून पडळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.Gopichand Padalkar

प्रा. लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसींचा निधी रोखल्याचा आरोप केला आहे. यावर पडळकर म्हणाले, उपमुख्यमंत्री पवार यांनी यावर तत्काळ बैठक घ्यावी. या बैठकीला सर्व ओबीसी नेत्यांना बोलवावे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित असावेत, त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. निधी अडवला असल्यास तो सोडता येईल, नसेल अडवला तर सांगता येईल. याबाबत स्पष्टता येईल.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांनी प्रा. हाके यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. यावर पडळकर म्हणाले, टीका करण्याऐवजी त्याचे उत्तर देऊन शंकेचे निरसन करावे. राज्याला देवेंद्र फडवणीस यांच्यासारखा गृहमंत्री मिळाला आहे. महिलांवरील अत्याचाराबाबत शासन संवेदनशील आहे. गृहमंत्री या विषयावर लक्ष ठेवून आहेत, अशा शब्दांत पडळकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे काैतुक केले.धनगर आरक्षण प्रश्नावर पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. धनगर समाजासाठी सरकारने अनेक योजना केल्या. मात्र, आरक्षण प्रश्नाचा निकाल लावण्याची मागणी होत आहे. ३१ मे च्या पार पडलेल्या कार्यक्रमात याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी मांडली आहे. नक्कीच आम्ही तो विषय मार्गी लावू. धनगर समाजाचे कार्यकर्ते बसून अजेंडा ठरवून आरक्षण प्रश्नावर पुढाकार घेणार असल्याचे पडळकर म्हणाले.

Sharad Pawar is acquitted in the case of making the corona statement that happened to Maharashtra

महत्वाच्या बातम्या