Sanjay Raut’ : संजय राऊत यांची पलटी, राज ठाकरे यांनी कॅफे खोलला आहे म्हणणारे म्हणू लागले आमचे दुसरे घर!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sanjay Raut’  मनसेसोबत एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्याने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटी मारली आहे. भाजप किंवा शिवसेना शिंदे गटाची नेतेमंडळी राज ठाकरे यांची भेट घ्यायची तेव्हा, राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये कॅफे खोलला आहे. तिथे लोक चहापाणी करायला येतात, असे राऊत म्हणायचे. पण राज ठाकरेंचे घर हे आमच्यासाठी दुसरे घर असल्याचे विधान आता राऊतांनी केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युती होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना मनसे – ठाकरे गट युतीबाबत राऊत म्हणाले की, नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलेले आहे. आम्ही सकारात्मक आहोत, राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे आणि आम्ही त्यांचे सहकारी अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला असेल. त्यामुळे यासाठी चिंतेचे कारण नाही. मी या दोन्ही भावांना पाहिले आहे. त्यामुळे 10 मिनिटांनी मी राज ठाकरेंना किंवा उद्धव ठाकरेंना फोन करणार आहे, असे हे दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करनार नाही ना. काय सांगावे फोन झाले सुद्धा असतील.

अमित ठाकरे यांनी तुम्हाला शिवतीर्थ कॅफेटेरियावर येण्याचे आमंत्रण दिले आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिले आहे. जसे आमचे आदित्य ठाकरे आहेत, तसे अमित ठाकरे आहेत. त्याची विधानेही फार गोड आहेत. त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे, त्या भावनेचा मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो. हल्ली त्यांची विधान फार चांगली आहेत. आदित्यची भूमिका उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमिलन हवे आहे. मी कॅफेमध्ये नाही तर मी घरी जाईल. आमच्यासाठी ते कॅफे नाही तर दुसरे घरच आहे.

Sanjay Raut’s reversal, who said Raj Thackeray opened a cafe started saying it’s our second home!

महत्वाच्या बातम्या