विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : Devendra Fadnavis राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार का यावर राज्यात चर्चा रंगली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात. त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे. ही सर्वात मोठी समस्या आहे, असे ते म्हणाले. पण काही हरकत नाही. माध्यमांचं ते कामच आहे, असेही त्यांनी सांगितले.Devendra Fadnavis
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची सध्या चर्चा आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया राज ठाकरे देतील. मी कशी प्रतिक्रिया देणार आह? माझा काय संबंध येतो त्यामध्ये? ते आपआपसात ठरवतील. यांनी साथ द्यायची, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की, त्यांनी द्यायचा नाही आहे.
- Devendra Fadnavis : आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयमी जीवनशैली आवश्यक, देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात. त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे. ही सर्वात मोठी समस्या आहे, पण काही हरकत नाही. माध्यमांचं ते कामच आहे. पण आता तरी त्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काही आहे, असं मला वाटत नाही.
तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसत? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी योग्य वेळी सांगतो. तुम्हाला माहिती आहे, मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो. तो उचित वेळी मी सांगत असतो.
राज ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात प्रश्न विचारला असता आज उद्धव ठाकरे म्हणाले की, “जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, ते होईल.” कारण एकत्र येण्याबाबत जे काही बाकीचे बारकावे आहे, ते आम्ही पाहात आहोत. त्यामुळे संदेश कशाला, मी तुम्हाला बातमीच देईन. कारण माझ्या शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे कोणते नेते आमच्या एकमेकांच्या संपर्कात आहेत, त्यांच्याही मनात संभ्रम नाही. त्यामुळे आम्ही कोणताही संदेश देण्यापेक्षा आम्हाला जी काही बातमी द्यायची आहे, ती आम्ही देऊ.
The media is starting to make noise about Raj-Uddhav coming together! Devendra Fadnavis’s observation
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी