विशेष प्रतिनिधी
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया (Dino Morea) कोणासोबत बसायचा, कोणासोबत असायचा हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो अस म्हणत मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या अटकेचे संकेत दिलेत. डिनो मोरिया हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवानेते आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो.
- Devendra Fadnavis : आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयमी जीवनशैली आवश्यक, देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
डिनो मोरियाच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. मुंबई नालेसफाई प्रकरणात त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. याच प्रकरणाकडे इशारा करत मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा मुलगा जेलची वारी करू शकतो अशी माहिती असल्याचा दावा केला आहे.
डिनो मोरिया प्रकरणात होणाऱ्या कारवाया आणि प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच ठाकरे बंधुच्या एकत्रीकरणाची चर्चा असल्याचाही राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याचा चर्चेची नितेश राणेंनी (Nitesh Rane) खिल्ली उडवली. आम्हाला झोप लागत नाही, एकाकडे 20 आमदार आणि एकाकडे शून्य यांची एवढी शक्ती आहे. या शक्तीला आम्ही घाबरलो आहोत. आम्हाला घाम फुटला आहे अशा शब्दात नितेश राणेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची खिल्ली उडवली आहे. हिंदूत्व सोडल्यामुळेच ठाकरे ब्रँड बुडाल्याचे ते म्हणाले .
दरम्यान, मिठी नदीच्या गाळ उपसा प्रकल्पातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीयबॉलीवूड अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबईतील घरावर छापा टाकला आहे. डिनो मोरियासह त्याचा भाऊ सॅन्टिनो मोरिया यांच्यावर देखील संशयाची सुई आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे छापे मुंबई आणि केरळमधील एकूण 15 हून अधिक ठिकाणी एकाचवेळी टाकण्यात आले. या प्रकरणी आधीच आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशी सुरु होती.
मुंबई महापालिकेच्या (BMC) मिठी नदी गाळ उपसा प्रकल्पात सुमारे 65.54 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. हा प्रकल्प 2019 ते 2022 या काळात राबवण्यात आला होता. आरोपानुसार, कंत्राटदार, मध्यस्थ आणि पालिका अधिकाऱ्यांनी संगनमत करून काम पूर्ण केल्याचे दाखवले, पण प्रत्यक्षात गाळ उपसा पूर्ण न करता फसवणूक केली.
Uddhav Thackeray’s son may visit jail during monsoon, Nitesh Rane hints at Aditya Thackeray’s arrest
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी